नमस्कार मित्रांनो.
धनत्रयोदशीच्या दिवशी धन लाभाच्या दृष्टीने एक अतिशय विशेष असा योग बनत आहे. शनिदेव मकर राशि मध्ये वक्री वाटचाल करत आहेत. ते २३ सप्टेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी मार्गी होणार म्हणजेच २३ सप्टेंबर पासून शनी आपल्या मकर राशि मध्ये सरळ रीतीने फिरू लागेल. काही राशींसाठी शनी मार्गी होणे शुभ मानल जातो. करिअर आणि आर्थिक प्राप्ती मध्ये त्यांना विशेष फायदा होण्याची संकेत आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या लोकांसाठी शनिचा मार्गी असण खूप खास मानले जात आहे. शनीच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना धन त्रयोदशीला पैसा मिळेल. व्यवसायातही फायदा होईल. भरतीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तर हा काळ नक्कीच चांगला आहे. त्याचबरोबर जी लोक इलेक्ट्रिक उपक्रम आणि वाहनांचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कपड्यांच्या व्यवसायात सुद्धा नक्कीच नफा होईल.
सिंह राशि- सिंह राशीच्या लोकांना सुद्धा या संक्रमणाचा फायदा होणार आहे. शनिच्या मार्गी होण्यामुळे तुम्हाला पैशाच्या बाबतीत फायदा होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे उत्पन्न सुद्धा वाढेल. जरी यावेळी तुमच्या हातातून पैसा खर्च होत असला तरीसुद्धा तुम्हाला करिअरच्या दृष्टीने सुवर्णसंधी मिळू शकतात. आणि तुम्हाला कुठून तरी उत्तम नोकरीची ऑफरही येऊ शकते.
तुळ रास- तूळ राशीच्या लोकांना दिवाळीपूर्वी विशेष लाभ होणार आहे. तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भावात शनीचे भ्रमण होणार आहे. आणि या संक्रमणाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात अचानकपणे वाट पाहायला मिळेल. तुम्हाला कुठून तरी अचानक पैसे सुद्धा मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीला सोन खरेदी करणे शुभ मानले जात आहे. मुलांच्या प्रगतीचे नवीन मार्गही खुले होऊ शकतात.
वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचे मार्गी होणे खूपच चांगले मानले जात आहे. या काळात वाहन सुख तुम्हाला मिळू शकते. त्याचप्रमाणे जमीन आणि मान्यतेच्या प्रकारे तुम्हाला जास्त फायदा होईल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला आनंद मिळेल. भाऊ बहिणीकडून सर्व प्रकारचा आनंद आणि आदर तुम्हाला मिळेल. या काळात तुमचा प्रवासही फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील हे मात्र खर. परंतु योजना यशस्वी होतील आणि मेहनतीला फळ मिळेल.
मीन रास- मीन राशीसाठी शनीची मार्गी होणे खूपच फायदेशीर ठरते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक सुवर्णसंधी मिळू शकतात. मग यावेळी तुम्ही तेथे यात्रेला जाण्याचा कार्यक्रमही करू शकता. ज्या लोकांना व्यवसाय आतापर्यंत नुकसान होत होत अशा लोकांसाठी शनीच्या शुभ प्रभावाने चांगला काळ सुरू होणार आहे.
तुम्हाला आराम मिळेल आणि घरातील समस्या ही संपतील. नोकरी आणि व्यवसायात सुद्धा यश मिळेल. मग मंडळी यामध्ये तुमची रास आहे की नाही आम्हाला नक्की सांगा. आणि जरी तुमची रास यामध्ये नसेल तरी नाराज होऊ नका. एक उपाय सांगते आहे तो करा. धनत्रयोदशीच्या दिवशी दिपदान करा. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.