यंदाच्या दिवाळीत राशीनुसार करा खरेदी. लक्ष्मीची होईल कृपा, झोपलेले नशिबही जागे होईल.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

दिवाळी म्हटलं की मनात येते पहिल्यांदा खरेदी यंदा दिवाळीत काय काय खरेदी करायच. असा विचार प्रत्येक जण करत असतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की खरेदी करतच आहात तर तुमच्या राशीनुसार करा. त्यामुळे नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे.

किंवा तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार त्याचा लाभ मिळणार आहे. तर हेच आज या मी तुम्हाला सांगणार आहे. की तुमच्या राशीनुसार यंदाच्या दिवाळी तुम्हाला कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे. चला तर सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तींनी यंदाच्या दिवाळीत चांदीच्या वस्तू किंवा चांदीची भांडी खरेदी करावीत. चांदी आपल्यासाठी शुभ आहे तसंच तुम्ही एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकतात. ते सुद्धा तुम्हाला लाभदायक ठरेल. जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे एखादा छोटासा चांदीचा नान जरी तुम्ही या दिवाळीत खरेदी केलं तरी सुद्धा तुम्हाला ते ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकत.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या व्यक्तींनी दिवाळीनिमित्त सोनं चांदी किंवा हिरे संबंधित वस्तू खरेदी कराव्यात. किंवा याचा एखादा दागिना खरेदी करा. सोनं चांदी किंवा हिरा खरेदी विशेष लाभदायक ठरू शकते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून सुख संपन्नता आणि वैभवाचा तो कारक आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या व्यक्तींनी दिवाळीनिमित्त सोन्याचा दागिना खरेदी करावा. किंवा घरासाठी हिरव्या रंगाच्या वस्तू खरेदी कराव्यात. जर आपण चांदीचा गणपती घरी आणला तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला लाभ पोहोचू शकतो.

कर्क राशी- कर्क राशीच्या व्यक्तींनी यंदाच्या दिवाळीत श्रीयंत्र घरी आणाव. त्यामुळे महालक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभू शकते. तसंच एखादा चांदीचा कलश किंवा चांदीची शिवपार्वतीची मूर्ती सुद्धा तुम्ही घरी आणू शकता. या गोष्टी घरी आणणे सुद्धा तुमच्यासाठी मंगलकार्य ठरेल.

सिंह राशी- सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दीपोत्सवानिमित्त सोने खरेदी करणे उत्तम मानले जात आहेत. दिवाळीला सोन्याची नाणी, दागिना खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरू शकत. नाहीत सोना चांदी तर तांब्याची निगडित वस्तूंची तरी खरेदी करावी. त्यामुळे सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो.

कन्या राशी- कन्या राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत हस्तिदंताची एखादी वस्तू खरेदी करावी. असं केल्यामुळे धनवृत्ती होऊ शकेल. तसेच दुर्गादेवीसाठी चांदीचे छत्र बनवून अर्पण करू शकता. त्यामुळे सुद्धा घरात धनधान्याची कमतरता भासणार नाही.

तूळ राशी- तूळ राशीच्या व्यक्तींनी दिवाळीला सौंदर्यप्रसाधनाशी संबंधित वस्तूंची खरेदी करावी. आपण कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे खरेदी करू शकता. याशिवाय लक्ष्मी देवीच्या सुंदराशी संबंधित एखादी वस्तू ही खरेदी करू शकतात. असं केल्याने सुद्धा सुख-समृद्धी वाढू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीत सोनं चांदी खरेदी करा. पण जर जमत नसेल तर तांब्याच्या वस्तूंची खरेदी सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.
धनु राशी- धनु राशीच्या व्यक्तींसाठी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदी उत्तम मानली जाते आहे. याशिवाय चांदीची खरेदी सुद्धा शुभ राहील. त्यामुळे घरात संपन्नता येईल.

मकर राशी- मकर राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा वाहन आणि चांदी खरेदी तसेच अगदीच नाही जमलं तर स्टीलच्या वस्तूंची खरेदी सुद्धा शुभ मानली जाते आहे. यातलाही काही नाही जमलं तर गृह सजावटीच्या वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करू शकत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला चांदीच्या वस्तूंची खरेदी करावी. याशिवाय स्टीलची भांडी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला फायदाच होईल. मीन राशीच्या व्यक्तींसाठी चांदी अत्यंत शुभ मानली गेली आहे. त्यामुळे चांदीची नाणी, चांदीची वस्तू चांदीचे दागिने तुम्ही या दिवाळीत खरेदी करू शकता. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *