नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. आणि त्यातच आश्विन महिन्यात येणारी कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. धर्म आणि कर्मासोबतच आयुर्वेदिक दृष्ट्या कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते. त्या दिवशी देवी पाहत असते की कोण जागे आहे.
कोजागिरी पौर्णिमेला जागरण करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी भजन कीर्तन असे अनेक उत्सव ठेवले जातात. कोजागिरी पौर्णिमेचा सण हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील होत असते. त्यामुळे रात्रभर विविध कार्यक्रमांमध्ये लोक हरवून जातात.
या दिवशी लोक भजन कीर्तन हरी नामाच्या गजरामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात. मान्यता आहे की या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. त्यामुळे त्या दिवशी तो खूप मोठा दिसतो. चंद्र या दिवशी आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो गेलेला आहे.
ज्योतिषा मध्ये चंद्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. चंद्राचा अनुकूल प्रभाव व्यक्तीचे भाग्य चमकवण्यासाठी पुरेसा असतो. चंद्र जेव्हा सकारात्मक असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होत असते. चंद्राचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असल्यामुळे या काळामध्ये मन आनंदी आणि प्रसन्न राहते. मन बलवान बनते. मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
एक नवी प्रेरणा मनामध्ये निर्माण होत असते. कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची विशेष पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करून विकजागिरी पौर्णिमेचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये भरभराट होते.
घरातील नकारात्मक वातावरण रोगराई संपूर्णपणे दूर होते आणि जीवन सुखी राहते. कोजागिरी पौर्णिमेला केलेल्या व्रताचा प्रभाव वर्षभर मनुष्याच्या घर परिवारामध्ये आनंद कायम ठेवतो. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करणे लाभकारी मानले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री खीर करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. काही भागात या दिवशी दूध ओतण्याची प्रथा आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध ओतून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवून आणि त्यानंतर ते प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना दिले जाते. मान्यता आहे की ही खीर किंवा दूध खाल्ल्याने वर्षभर मनुष्याच्या जीवनामध्ये रोगराई येत नाही. शारीरिक व्याधी स्वस्त आणि सुदृढ बनतात. जर काही बिमाऱ्या शरीरामध्ये असतील तर त्या आपोआप निघून जातात. या दिवशी रोगी व्यक्तींच्या शरीरावर या चंद्राचे किरण पडल्याने म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचे किरण पडल्याने त्याच्या शरीरातील अनेक रोग दूर होतात.
अशी देखील मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशाने पृथ्वी प्रकाशमान होते त्यामुळे या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी स्वर्गलोकांतून देवता देखील पृथ्वीवरती येतात. यावर्षी अश्विन शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक ०९ ऑक्टोंबर रोजी पहाटे ३ वाजून ४३ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे.
याच दिवशी उत्तर रात्री २:२५ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे.कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळा आपल्यासाठी राज योगासमान ठरू शकतो. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.
घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सुख-समृद्धीची बहार आपल्या जीवनामध्ये येणार आहे. या काळामध्ये मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. मनामध्ये असणारी चिंता चिडचिड आता दूर होणार आहे. मागील काही दिवसांपासून एखाद्या बिमारीने ग्रस्त असाल ती बिमारी सुद्धा आता दूर होणार आहे. व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे.
वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देईल. नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. कौटुंबिक आणि पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा शुभ प्रभात दिसून येईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. शुभ आणि सकारात्मक काळाची अनुभूती आपल्याला येणार आहे. मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणारा आहात. आपल्या आत्म विश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
नोकरीमध्ये यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येईल. कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. पद प्रतिष्ठा आणि मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. साहित्यिक लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
आपल्या कलीची प्रसिद्धी होणार आहे. आपल्याकडे असणाऱ्या प्रतिभेचा उपयोग करून आर्थिक प्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणार आहात. या काळामध्ये स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अनुकूल प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
स्वतःमध्ये एखाद्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. जीवनातील आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील भरगोस यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. चांगली नोकरी मिळू शकते.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल.
मानसिक ताणतणावापासून मुक्त होणारा आहात. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होणार आहे. या काळामध्ये परिवारातील अनेक लोक आपली चांगली मदत करतील. करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. करियर मध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले भाग्य. धनप्राप्ती समाधानकारक होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.
आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. नवीन उद्योग व्यवसाय आरंभ करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. हा काळ आपल्या राशीसाठी एखाद्या वरदान समान ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.