कोजागिरीच्या रात्री देवघरात ठेवा या ३ वस्तू लक्ष्मीची होईल कृपा. आनंदाने बहरून जाईल आपले जीवन.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण कोजागिरी तिथी साजरी करतो. या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी स्वतःभोतलावर विचरण करते. आणि कोण जागा आहे कोण प्रभू नामाचा जप करत आहे असे विचारते असं म्हटलं जात. या कोजागिरीच्या रात्री जागरण करण म्हणून आवश्यक असतात. कारण जी व्यक्ती जागी असते ईश्वराच नामस्मरण करत असते.

त्याच्याच घरी लक्ष्मी प्रवेश करते असं म्हटलं जात. त्याच बरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्या कुलदेवतेच्या नावाचा जप नक्की करावा. किंवा आपली ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवतेच्या नावाचा जप करावा. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. कोजागिरीच्या रात्री फक्त माता लक्ष्मीच नाही तर इतर देवी देवता सुद्धा भूतलावर अवतरण करतात असं मानलं जात.

चंद्र प्रकाशातून जे अमृत पडतं त्या अमृताचा लाभ आपल्याला घ्यायचा असतो. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याचे फायदे सांगितले जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं कोजागिरीच्या रात्री तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायच्या आहेत. किंवा त्याची स्थापना कोजागिरीच्या रात्री जर तुम्ही तुमच्या देवघरात केली तर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच तुमच्यावर होते.

त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्याच घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नक्कीच असते. पण जर तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुमच्या देवघरांमध्ये स्थापित करा.

एका गोष्टीची काळजी घ्या की माता लक्ष्मी स्थापन करताना ती बसलेल्या रूपात असणं आवश्यक आहे. माता लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा ज्या फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी आहे त्या घरामध्ये पैसा टिकत नाही असं म्हटलं जात. कारण माता लक्ष्मी मुळातच चंचल आहे. ती एका ठिकाणी जास्त काळ वास्तव्य करत नाही. म्हणूनच बसलेल्या स्थितीमधली मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये स्थापित करावा.

दुसरी गोष्ट म्हणजे कवडी तस तर कवडीचे एकूण १०८ प्रकार असतात. परंतु आपल्याला ५ प्रकारच्या कवड्या बाजारातून आणायच्या आहेत. त्यामध्ये सोनेरी कवडी जिला सिद्धी कवडी म्हणतात. दुसरी धुरकट रंगाची येते तिला द्या व्याघ्री कवडी म्हणतात. तिसरी कवडी म्हणजे वरच्या बाजूला थोडासा पांढरा रंग अशा प्रकारची कवडी असते.

तसंच सफेद कवडी किंवा चिंताकण कवडी अशा अनेक प्रकारच्या कवड्या आहेत. तर आपण त्यातली कोणतीही एक कवडी खरेदी करा आणि त्यातही आपल्याला लाभ देणारी कवडी हवी असेल तर सव्वा तोळा एवढ्या वजनाची सर्वश्रेष्ठ फळ देणारी कवडी मानली जाते. तस तर कवडीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे.

जशी माता लक्ष्मी सुद्धा समुद्रमंथनातून आली आहे त्याच प्रकारे कवडी देखील समुद्रमंथनातून आली आहे अस म्हटल जात. आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला कवडी प्रिय आहे. जर घरात नेहमी कोणी ना कोणीतरी आजारी पडत असेल तर आजारी व्यक्तीच्या गळ्यात ही कवडी घालावी. त्यामुळे आजारी व्यक्तीला मानसिक शांतता मिळते आजार बरा व्हायला मदत होते.

त्याबरोबरच डॉक्टर दवाखाने आणि औषधही चालू ठेवावे. ज्याला संतान प्राप्ती करायचे आहे त्याने सुद्धा कवडीचा हा उपाय करावा. धनप्राप्तीसाठी सुद्धा कवडी लाभदायक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख मित्रांनो दक्षिणावर्ती शंखाची स्थापना आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरांमध्ये करावी. आणि हे करताना त्या शंकाच शुद्धीकरण होणं सुद्धा आवश्यक आहे.

आता शुद्धीकरण करायचं म्हणजे काय करायच आपल्या घरात जर गंगाजल असेल तर उत्तम नसेल तर स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्याने तो शंख धुऊन घ्या. आपल्या देवघरासमोर बसून एक लाल रंगाचं कापड अंतरा आणि त्या कपड्यावर शंखाची स्थापना करा. नंतर आपण त्यात गंगाजल भरायचा आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा फक्त अकरा वेळा जप करायचा आहे.

तो मंत्र याप्रमाणे आहेत ओम श्रेयम लक्ष्मी समुदराय नमः याप्रमाणे जप केल्यानंतर हा शंख आपल्या देवघरात किंवा तिजोरी मध्ये ठेवून द्यायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो असं म्हटलं जात. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही या तीन पैकी कुठलीही एक वस्तू घरी आणा आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरात करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल अस वास्तुशास्त्र सांगत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *