माहिती करून घ्या घरावर झेंडा फडकविण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे. होतील हे अजब फायदे आणि ही चूक केली तर….

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आपल्याकडे १५ ऑगस्टला ध्वजावंदन केल जात. प्रत्येक पक्षाचाही झेंडा असतो पथकांकडे आपण विजयाचे प्रतीक म्हणून बघतो. एखादी मॅच जिंकली तर आपण देशाचा ध्वज फडकवतो एवढाच काय पण पाडव्याला गुढी बरोबर बरेच लोक घरावर झेंडे फडकवत असतात. मंडळी आपल्याकडे ध्वजाला झेंड्याला तितकच महत्त्व आहे.

पण तुम्हाला माहित आहे का राष्ट्रीय महत्त्व तर आहेच त्या बरोबरीने ज्योतिष शास्त्रीय महत्त्व पण तेवढच आहे. ते काय आज आपण पाहूया. हिंदू धर्मानुसार घरावर ध्वज लावणारे अतिशय शुभ मानल गेल आहे. त्यामागे अनेक कारण आहेत अर्थात ज्योतिष शास्त्रानुसार झेंडा लावणे त्याचे फायदे आणि त्याची कारण बरीच वेगवेगळी आहेत.

पाहूया झेंडे कशा प्रकारचे असतात. ध्वज हा केशरी रंगाचा असावा. आणि त्यावर स्वस्तिक किंवा ओम किंवा राम लिहिलेल असाव. तसंच दोन प्रकारचे ध्वज असतात एक म्हणजे त्रिकोणी आणि दुसरा म्हणजे दोन त्रिकोण असतात तसे. यापैकी कोणत्याही प्रकारचा ध्वज तुम्ही लावू शकतात. मंडळी आता पाहूया याने काय होत.

मंडळी घरावर ध्वज उभारल्याने नेमकं होतं काय ते पाहूया. ध्वजाला विजय आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानल गेल आहे. त्यामुळे पूर्वी जेव्हा जेव्हा युद्धामध्ये विजय मिळायचा तेव्हा ध्वज लावला जायचा ध्वज उभारले जायचे. त्यामुळे यश कीर्ती आणि विजय संपादन होत असे. तसेच असं म्हटल जातं घरातल्या व्यक्तीची रोगापासून दुःखापासून नाश होतो.

घरातली सुख-समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रानुसार ध्वजाला शुभतेछे प्रतिक मानल गेल आहे. असं मानलं जातं की घरातली नकारात्मक ऊर्जा ही कमी होते. किंवा नाहीशी होते. वाईट नजरेपासून आपल्या घराचा संरक्षण होत. ज्योतिष शास्त्र सांगत की राहुला आपल्या दुःखाचं रोगाचं आणि दोषाचं कारण मानल गेल आहे.

तेव्हा अस मानल जात की, घराच्या उत्तरेला आणि पश्चिमेला ध्वज उभारला गेला तर घरातील सुख समृद्धी ही कायम राहते. तसेच घरातील माणसांच्या समस्या मग त्या आरोग्याला धरून असू दे किंवा मग आर्थिक असूदे त्याही दूर होतात. त्यामुळे पण घरावर झेंडा उभारावा.

मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा. युद्धभूमीवर रथाला लावण्यात येणारा ध्वज आणि घरावर उभारला जाणारा ध्वज यात थोड्याफार प्रमाणात का होई ना बदल असतो. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. युद्धभूमीवर जो ध्वज असायचा त्यामध्ये सात आठ प्रकार होते त्यात जय विजय भीम चपळ वैजयंती दीर्घ विशाल आणि शेवटचा म्हणजे लोन हे सगळेच सांकेतिक झेंडे होते.

उदाहरण द्यायच झाल तर लोन झेंडा हा प्रचंड रक्तपाताचा सूचक होता. मंडळी घरावर जो झेंडा फडकवला जातो तो मात्र तीन रंगांपैकी कोणताही उभारला तरी चालतो तो शुभच ठरतो. तीन रंग म्हणजे कोणते भगवा आणि गेरू हा रंग एक सारखा आहे पण केसरीच्या झेंड्यात तसा थोडाफार फरक आपल्याला दिसतो.

या दोन ऐवजी तिसरा रंग म्हणजे पिवळा यातला भगवा रंग तीन प्रकार असतात. एक म्हणजे ध्वज पताका आणि तिसरा म्हणजे दंडा याला ईश्वरीय स्वरूप मानले गेलेल आहे बर का. मंडळी माणसाच्या आयुष्यात एकदा तरी अशी स्थिती येते जिथे आपली विचार करण्याची शक्ती थांबते. आर्थिक दृष्ट्या आपण कंगाल होतो.

ती ही स्थिती आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी आणि मंगळ यांच्या कारणामुळे येते. असा तज्ञांचा मत आहे. तेव्हा आपल्या घरावर झेंडा फडकवला की या स्थितीमधून बाहेर पडायला थोडी मदत होते. आणि बिघडलेली स्थिती ही पूर्वपदावर येण्यासाठी पण मदत होत असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *