नमस्कार मित्रांनो.
आज आपण नवरात्री मध्ये केल्या जाणाऱ्या अशा काही उपायां बद्दल बोलणार आहोत. ज्याने तुम्ही तुमची आर्थिक चणचण मीठवू शकता. नवरात्रीला एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून आई जगदंबे ला त्या अर्पित करा. हा उपाय केल्याने आपल्या घरात येणारे पैशाचे मार्ग मोकळे होतात.
त्याचबरोबर नवरात्रीत एक संपूर्ण पाणी घेऊन त्याच्यावर एक लवंग आणि एक वेलची ठेवा आणि विडा तयार करा. हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा. कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी हा उपाय अधिक अचूक मानला जातो. विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात त्या प्रवाहित करा. अपुरी इच्छा पूर्ण होईल अस मानल जात.
आंब्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला सिंदूर आणि श्रीराम लिहा. आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला ते अर्पित करा. हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान हे श्रीरामाचे भक्त आहेत. म्हणून हे पान त्यांच्या जवळ ठेवावे. किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर ठेवावा. या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते.
जर तुमची इच्छित प्रगती होण्यामध्ये अडथळे येत असतील तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावून हे पान नवरात्रीत आई जगदंबेला अर्पण कराव. आणि नंतर हे पान स्वतः जवळ घेऊन झोपाव. दुसऱ्या दिवशी उठून विड्याच पान आपल्या जवळच्या आई जगदंबेच्या मंदिराच्या मागील बाजूस नेहून ठेवाव. ते पान फेकू नये हे लक्षात ठेवा. यामुळे प्रगतीमध्ये येणारे अडथळे मोकळे होतात अस म्हटल जात.
मंदी जाणवत असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही एक नियम करा. ठराविक वेळेवर विड्याचे एक पान घ्या. ते आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन अर्पित करा. यासाठी एक वेळ निश्चित करणे मात्र महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा प्रभाव वाढावा अस वाटत असेल तर नऊ दिवस सकाळी ४ ते ६ यादरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्य सुंदरी देवीचे ध्यान करून विड्याच्या पानांचे मूळ घासून ते तिलक कराव.
या उपायाने आपला प्रभाव वाढतो असे म्हणतात. त्याचबरोबर दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर एका पानाच्या वेड्यावर रीम लिहून आई जगदंबेला ते अर्पित करा. आणि महानवमी नंतर ते पाच विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा हा उपाय तुमचे आर्थिक प्रश्न सोडवतो. घरातील देव्हाऱ्यात पूजेचा वास असल्यास घरातील शांतता प्रभावित झालेली असल्यास नवरात्रीच्या नऊ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दूर्गा सोस्त्र किंवा दुर्गा नामावली चा जप करा.
घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ सुद्धा करा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. आणि जर सोमवारी आणि गुरुवारी कुटुंबाला घेऊन येण्याचे सेवन करा. त्याचबरोबर संतान प्राप्तीची इच्छा असल्यास कंद देवीला नऊ विडे अर्पित करा. आणि नऊ सुवासिनींना म्हणजेच ज्यांना मुल आहेत वस्तू भेट करा.