नमस्कार मित्रांनो.
शास्त्रानुसार जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपल भाग्य घेऊन जन्माला येतो.काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्याने अगदी काही वेळात जास्त यश मिळत. पण काही जणांना कितीही कष्ट केले तरी सुधा यश हुलकावणी देत राहत.
ज्योतिष शास्त्रानुसार बारा राशी पैकी चार राशींच्या मुली अशा आहेत की ज्यांना भाग्यवान म्हणायला हव. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना भाग्यवान का म्हणायच हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया धनु राशि पासून.
धनु रास- धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे गुरु हा अतिशय शुभ मानला जातो. ह्या ग्रहाच्या प्रभावामुळे धन आणि संपत्तीची प्राप्ती होते. धनु राशि वर ग्रहांची विशेष कृपा असल्यामुळे या राशीची लोक भाग्यवान मानले जातात. हे लोक जे काम हातात घेतात त्यात त्यांना यश मिळत. या राशीच्या मुली अतिशय नशीबवान असतात.
कारण धनु राशीच्या मुलींचा स्वभाव शांत करारी आणि शिस्तप्रिय असतो. तसेच यामुळे गरिबावर प्रेम करणाऱ्या अडल्या नडल्याला मदत करणाऱ्या आणि जशी समोरची व्यक्ती असेल तशीच वागणूक देणाऱ्या असतात. म्हणजेच लहान बालकाच्या सहवासात त्यांचा वासल्य भाऊ जागृत होतो.
तर वडीलधाऱ्या व्यक्तींसमोर त्या नम्र होतात. त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात त्यांच्या प्रेमभावना उचंबळून येतात. परमेश्वराच्या मूर्ती समोर त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होतात. तर दुरुस्त आणि नालायक व्यक्तींवर त्या तुटून पडतात. मंडळी धनु राशीच्या मुलींना सासरी कशाचीच कमतरता नसते. यानंतरची रास मीन रास-
मीन रास- या राशीच्या मुली मनाने अतिशय प्रेमळ आणि गुणवान असतात. त्या स्वतःबरोबर इतरांबद्दलही भाग्यशाली मानल्या जातात. ज्यांच्या घरात जातात त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. या राशीच्या मुली आपल्या करिअरमध्ये ही उच्च स्थान प्राप्त करतात. असं जरी असलं तरी मीन राशीच्या स्त्रिया या सात्विक स्वभावाच्या असतात. आता वळूया वृषभ राशीच्या मुलींकडे.
वृषभ रास- वृषभ राशीच्या मुली अतिशय बुद्धिमान आणि मेहनती आणि भाग्यवान असतात. त्या आपल्या मेहनतीने करिअरमध्ये यशस्वी होतात. त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या नशिबाचा लाभ मिळतो. असं राशीच्या मुलींना सगळ्याच गोष्टी टापटीप पणा लागतो. त्यांची सौंदर्यदृष्टी ही चांगली असते. तर अशा या वृषभ राशीच्या मुली ही भाग्यवान म्हणावे लागतील.
कर्क रास- कर्क राशीचे लोक भाग्यवान मानले जातात कारण त्या ज्या कामात हात घालतात ते काम सफल करून दाखवतात. या राशीच्या मुलींचे नशीब फार बळकट असत. त्यामुळे त्यांना सुख-समृद्धी प्राप्त होते. कर्क राशीच्या स्त्रिया या काही बाबतीत प्रेमळ पण काही बाबतीत निश्चय गृह कर्तव्यदक्ष धार्मिक वृत्तीच्या कृती कलांमध्ये नीपूर्ण असलेल्या, स्वयंपाक घरावर प्रेम करणाऱ्या आणि कसल्या ना कसल्या कामात सतत स्वतःला गुंतवून घेणाऱ्या असतात.
कर्क राशीच्या मुलींना स्वच्छतेची ही आवड असते. स्वतःपेक्षा जास्त ते नवऱ्याकडे आणि मुलाकडे लक्ष देतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घराचं बजेट उत्तम परीने सांभाळतात. आणि म्हणूनच कर्क राशीच्या मुली ज्या घरात जातात त्या घराचं कल्याण करतात.
तर मंडळी या होत्या त्या ४ राशी ज्या राशीच्या मुली भाग्यवान म्हणावे लागतील. त्या त्यांच्या स्वभावामुळे आणि अंगी असलेल्या गुणांमुळे. तर मंडळी तुमची रास कोणती आहे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर याबाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे सकारात्मक की नकारात्मक पण नक्की कळवा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.