नमस्कार मित्रांनो.
सप्टेंबर महिना अतिशय उत्तम मानला जात आहे. नवग्रहां पैकी महत्त्वाचे ग्रह या महिन्यांमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर प्रभाव राहणार आहे. आणि तसेच या महिन्यात अनेक अद्भुत शुभ योग ही जुळून येत आहेत. याचा सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
सप्टेंबर महिन्यात तीन तारखांना खूप महत्त्व १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशि मध्ये वक्री होणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत सूर्यग्रहाचे महत्त्वपूर्ण गोचर होईल. शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीतील तिसरी महत्त्वाची घटना असेल. शुक्र तीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत विराजमान होईल. या तीन ग्रहांच्या कन्या राशीतील गोचरामुळे शुभ मानला गेलेला त्रिग्रह योग जुळून येत आहे.
याशिवाय काही अद्भुत असे योगही जुळून येत आहेत. सप्टेंबर महिन्यातील ग्रहांच्या शुभ स्थितीचा नेमका कोणत्या राशींना फायदा होणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.
मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तींना हा त्रिग्रही योग यशकारक ठरू शकतो. अपूर्ण आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला कामातही यश मिळेल. विरोधकांवर तुमचे वर्चस्व असेल. आरोग्य चांगले राहील. सरकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना किंवा त्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ अत्यंत फायदेशीर आहे. काही सकारात्मक बातम्या या महिन्यात तुम्हाला मिळतील.
मिथुन राशी- मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा हा त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो. समाजात प्रतिष्ठा वाढेल. या काळात कौटुंबिक संबंध विशेषता मजबूत असतील. घराच्या नूतनीकरणाचा विचार प्रत्यक्षात आणू शकाल. कामाच्या ठिकाणी हे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. काम करताना संयम बाळगण मात्र आवश्यक आहे. या कालावधीत बूध विक्री होत असल्याने शुभ परिणाम मिळू शकतील. मेहनतीचे फळही त्यांना मिळेल.
कर्क राशी- कर्क राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन उत्तम असेल. आरोग्य संबंधीचे प्रश्न सुटतील. कामात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. प्रवास भाग्यकारक ठरू शकतो. चांगले कौटुंबिक जीवन आणि समाजात आदर या सोबतच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ ही मिळू शकेल.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. ज्यामुळे तुमच्याकडे अधिकाधिक पैसा जमा होत राहील. तुम्हाला मानसिक तणावापासून सुद्धा मुक्तता मिळू शकते. चांगले कौटुंबिक वातावरण आणि तुमच्या रोमँटिक नात्यासंबंधी अनुकूल परिणाम जाणवतील.
विद्यार्थी कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यशस्वी ठरू शकतील. त्रिग्रही योगासह कन्या राशीत जमून येत असलेला लक्ष्मीनारायण योग अतिशय शुभ मानला गेलेला आहे. हा योग बुद्धी आणि ज्ञानाने समृद्धी देतो. अशी मान्यता आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.