पितृपक्षात या उपायांनी करा पितृदोष निवारण.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

पितृदोष हे राहूच्या दोषांच्या नावाने दर्शवले जातात आणि हे राहूचे दोष इतके वाईट असतात की जगण मुश्किल करतात. काही दोष घराण्यात माणसांना सतत छळतात. काही ठिकाणी नेहमी आर्थिक संकट येतात. काही घरात सर्व सुख सोयी असून सुद्धा अस्वस्थता राहते. काही घरांमध्ये कारण नसताना सतत भांडण होतात.

तर काही घरात जेवण तयार असूनही शांत रितीने ते खायला मिळत नाही. असे एक ना दोन अनेक रीतीने राहू दोष त्या घरातील व्यक्तींना छळतात. या सर्वांवर उपाय म्हणजे शिव उपासना, भगवान शंकरांची उपासना करणे, उपासकाची जसजशी उपासना वाढेल तस तशी त्याची या दोशातून सुटका होते.

शिव उपासनेने राहूचे दोष जातात. तो मनुष्य त्या त्रासातून मोकळा होतो. शिव उपासना म्हणजे रुद्राभिषेक करणे किंवा सोमवारी उपवास करणे तो संध्याकाळी प्रदोष काळी सोडणे. सोमवार हा शिवाचा वार आहे. त्या दिवशी जमल्यास कोरडा उपवास करावा आणि तो संध्याकाळी सोडावा. जमल्यास निर्जला उपवास करावा आणि संध्याकाळीच पाणी प्याव.

ओम नमः शिवाय नामाचा जप सतत त्या दिवशी करावा. श्री दत्तात्रेय भगवंतांची मूर्ती ही शिवमुर्तीच आहे. श्री दत्तात्रेय तीन मूर्तींचा अंतर्भाव आहे. ब्रम्हा विष्णू महेश श्री दत्तात्रेयांची उपासना केल्यास ईशिवापासनेचे फळ मिळतात. त्याशिवाय घरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा. धूप करावा. रुद्राक्ष असलेली माळ धारण करावी.

शक्यतो उपवासाच्या दिवशी आपण कोणालाही स्पर्श करू नये. किंवा कोणाकडूनही स्पर्श करून घेऊ नये. कित्येक घराण्यांचे म्हणजेच कुटुंबांचे गणपती हे दैवत असते. त्यांनी तर त्यांची उपासना करावीच परंतु ज्यांचे हे दैवत नसेल त्यांनी सुद्धा गणेशाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घ्यावे.

गणपती ही राहूची देवता असल्याने ज्यांना राहूची पीडा आहे त्यांनी गणपतीची उपासना करणे आवश्यक आहे. राहूचा दोष पिढ्यान पिढ्या चालू राहतो. तो लवकर संपत नाही. तो घराण्याचा दोष असतो. म्हणूनच त्या सर्वांनीच गणपतीची उपासना करण आवश्यक असत.

काही घरांमध्ये सगळीकडे लाल मुंग्या निर्माण होतात. कितीही औषध वापरली तरी सुद्धा गुणकारी ठरत नाही. घराण्याचा दोष असेल तर लाल मुंग्या सतत होत असतात. त्यासाठी घरात सर्व ठिकाणी कानाकोपऱ्यात कापूर कुटून त्याची पावडर टाकावी. कापूर अतिशय पवित्र असल्याने घरातील असे दोष निघून जातात.

आपत्य न होणे गर्भधारना होऊनही गर्भ न राहण. आईच्या पोटात पाच सहा महिने गर्भ वाढून नंतर आपोआप गर्भपात होण, मूल जन्माला नंतर एक दोन महिन्यात किंवा वर्षात जाण, जन्मलेल्या मुलांमध्ये व्यंग असण, काही वेळा अर्धवट बुद्धीचे अविकसित मूल जन्माला येणे हे सगळेच घराण्याचे दोष मानले जातात. हे सर्व दोष अनुवंशिक असतात. हे राहूचे दोष असतात.

कारण वैद्यकीय इलाज करूनही गुण येत नाही आणि अशावेळी माणस हातबल होतात. या सगळ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोषाचा निवारण होण आवश्यक असत. त्यासाठी तुम्ही मगाशी म्हटल तस शिव उपासना किंवा गणपतीची उपासना किंवा दत्तात्रयांची उपासना करावी.

त्याचबरोबर पितृपक्षांमध्ये पक्ष श्राद्ध आवर्जून करावे. कारण पितृपक्षांमध्ये केलेल पक्ष आणि श्राद्ध हे पितरांपर्यंत पोहोचत आणि पितर शांत होतात आणि त्यांच्या संबंधित आपल्याला लागलेले दोषही निघून जातात.अस म्हटल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *