नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो तुम्ही लक्ष्मीनारायण योगा बद्दल ऐकल का, सप्टेंबर महिन्यामध्ये काही राशींसाठी हा लक्ष्मीनारायण योग आहे. अर्थात त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या भरपूर फायदा होणार आहे. करिअरमध्ये सुद्धा त्यांना यश मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लक्ष्मीनारायण योग म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या राशीमध्ये शुक्र ग्रह आणि बुध ग्रह यांची युती होते तेव्हा त्या योगाला म्हणतात लक्ष्मीनारायण योग.
असा योग तयार होतो आहे कन्या राशि मध्ये, कन्या राशि मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये शुक्राची आणि बुधाची युती होते आहे. आणि त्यामुळेच हा लक्ष्मीनारायण योग तयार झालाय याचा फायदा काही राशींना पोहोचणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.
मेष रास- सप्टेंबर महिन्यात तयार होणाऱ्या लक्ष्मीनारायण योगामुळे मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळू शकतो. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. अविवाहितांचे लग्न सुद्धा ठरू शकते. मित्राच्या मदतीने एखादे महत्त्वपूर्ण कामही होऊ शकते. त्यानंतरची रास आहे कर्क रास.
कर्क रास- बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेल्या लक्ष्मीनारायण योगाचा कर्क राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने फायदा होईल. सहकारी मदत करतील. या काळात धनलाभ सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला मालमत्ता विकायची असेल तर चांगले डील होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ सुद्धा तुमचा जाईल. आज केलेल्या गुंतवणुकीमुळे भविष्यात नक्कीच नफा होईल. लक्ष्मीनारायण योगाचा फायदा मिळणारी तिसरी रास आहे कन्या रास.
कन्या रास- अर्थात कन्या राशि मध्येच ही यूती होते आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा सप्टेंबर महिना शुभ राहील. नवीन संधी शोधून काढल्या तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नही वाढेल. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. जमीन आणि मालमत्तेतून सुद्धा तुम्हाला लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कर्जातूनही मुक्ती मिळेल. या काळात एकंदरीतच तुम्हाला आनंदी आनंद मिळेल. आणि आराम मिळेल.
धनु रास- धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात सप्टेंबर च्या सुरुवातीपासूनच वाढ होऊ लागेल. तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. अचानक कुठून तरी पैसे किंवा भेट वस्तू सुद्धा मिळू शकतात. तुमच्या कामाच सुद्धा कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. नोकरी बदलण्याची तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल. थोडक्यात काय तर लक्ष्मीनारायण योगामुळे लक्ष्मी तुमच्या घरी चालत येईल.
मग मंडळी तुमची रास यामध्ये आहे की नाही आम्हाला नक्की सांगा. आणि ज्यांची रास यामध्ये नाहीये त्यांना सुद्धा माता लक्ष्मीची कृपा हवी आहे तर त्यांच्यासाठी एक उत्तम उपाय सांगते तुमच्यावर लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहावी अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा नियमित पाठ करा.
अष्टक अगदी छोटस आहे. म्हणायला सुद्धा सोप आहे. रोज जर ते तुम्ही म्हटलात तर लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर होणार यात काही शंकाच नाही. स्वतःच अनुभव घेऊन बघा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.