ज्येष्ठा गौरी पूजेत करू नका या तीन चुका नाहीतर तर आयुष्यभर बसाल रडत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

अनुराधा नक्षत्रावर आपण गौरींच आवाहन करतो. गौरी आपल्या घरी येतात आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर या गौरीचं पूजन केलं जात. देवी गौरीची पूजा करताना पूजेचे काही नियम सांगतो आहे. कृपया या नियमांचे पालन आपण नक्की करा. देवी गौरीवर पूर्ण श्रद्धा ठेवून एकाग्रतेने आपण तिची पूजा करावी.

देवी गौरीचं तोंड म्हणजेचं मुख हे कधीच दक्षिणेकडे करू नये. देवी समोरची समई आपण लावलेली आहे त्या समई मध्ये एक तीन पाच अशा विषम ज्योती असाव्यात. देवी गौरीला एका हाताने कधीच नमस्कार करू नये. दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. देवी गौरीच्या पूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावेत.

देवी गौरीला वाहिलेली फुले आपण स्वतः कधीच वापरू नयेत. किंवा त्यांचा वास घेऊ नये. देवी गौरीचे आसन नेहमीच आपल्या असण्यापेक्षा उंच ठेवावे. देवी गौरीस नैवेद्य अर्पण करताना तो नेहमी देवीच्या उजव्या हाताला ठेवावा. नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली पाण्याने चौकोन काढावा.

देवी गौरीला उदबत्ती किंवा निरांजनाने ओवाळताना ती आपल्या उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर आणि वरून उजवीकडे खाली अशी देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी. देवीला नैवेद्य दाखवून झाला की तो थोडावेळ तसाच देवी गौरी समोर ठेवावा.

पूजेनंतर सर्वांना प्रसाद वाटावा व नंतर आपण स्वतः प्रसाद भक्षण करावा. पूजेनंतर देवी गौरीला सर्वांनी मनोभावे नमस्कार करावा. तर मित्रांनो गौरी पूजनामध्ये या काही नियमांचे पालन आपण नक्की करा धन्यवाद ओम नमो नारायणा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *