सोमवारच्या दिवशी चुकूनही करू नका या ५ वस्तूंच दान घरात येते दारिद्र्य.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सोमवारचा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. सोमवार हा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित आहे. मित्रांनो भगवान भोलेनाथ देवाधिदेव महादेव आहेत. ते अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने एक तांब्याभर पाणी जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे देवत असून ते अतीशिग्र प्रसन्न होतात. आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. मित्रांनो सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करू नये किंवा कोणत्या वस्तूचे दान करणे अतिशय उत्तम मानले जाते हे आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो शास्त्रानुसार किंवा आपल्या पूर्वजांनी किंवा परंपरागत चालत आलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यामधून आपल्याला अनेक गोष्टींचे संकेत प्राप्त होतात. कोणत्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या गोष्टी नाही करायच्या हे आपल्या पूर्वजांनी अगोदर सांगितले आहे. त्यामुळे मित्रांनो सोमवारच्या दिवशी काही वस्तूंचे दान शुभ मानण्यात आले असून काही वस्तूंचे दान हे अतिशय अशुभ मानले जाते.

काही वस्तू अशा असतात त्या जर चुकूनही दान केल्या तर आपल्या घरी मोठे दारिद्र येऊ शकते आणि काही वस्तू अशा असतात की त्यांचे दान केल्याने घरात पैसा तर येतोच पण सुख-समृद्धी आणि वैभव देखील प्राप्त होते. आपण सुरुवातीला पाहूयात की सोमवारच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते.

मित्रांनो भगवान शिव म्हणतात शिवपुराणानुसार सोमवारच्या दिवशी या वस्तूंचे दान करणे अतिशय शुभ आणि सकारात्मक मानले जाते. मित्रांनो दानधर्म करणे हे सर्वश्रेष्ठ मान्यता आले आहे. कारण दान केल्याने आपल्याला आत्म सुखाचे अनुभूती होते. त्यामुळे दान करणे हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रानुसार मनुष्याने संपूर्ण जीवनामध्ये चार वेळा गुप्तदान करणे आवश्यक आहेत.

बालवयात, किशोर वयात, तरुण वयात आणि वृद्धावस्थेमध्ये व्यक्तीने गुप्त दान केले पाहिजे. त्यामुळे मृत्यूनंतर व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते. मित्रांनो काही वस्तू अशा आहेत आपण ज्या दान करू शकत नाही किंवा काही वस्तूंचे दान हे शुभ मानण्यात आले आहे. पण काही वस्तू अशा आहेत ज्यांचे दान केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुर्भाग्य दूर होते. आर्थिक दुर्भाग्य दूर होते. सुख सौभाग्याची प्राप्ती होते आणि आनंदाने मनुष्याचे जीवन फुलून येते.

मित्रांनो जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी चालू असतील. पती-पत्नीमध्ये वाद चालू असतील. घरामध्ये सतत भांडण तंटे होत असतील. घरामध्ये सर्वत्र नकारात्मक वातावरण असेल आणि एकत्र राहणे फार अवघड बनले असेल पती-पत्नीची एकत्र राहणे देखील अवघड बनले असेल तर अशा काळामध्ये मित्रांनो अशा काळामध्ये आपल्याला गुळ आणि चण्याचे दान करणे अतिशय शुभ मानण्यात आले आहे.

गुळ आणि चण्याचे दान जर आपण सोमवारच्या दिवशी केले तर ते अतिशय उत्तम मानले जाते. त्यामुळे घरातील सुख समृद्धी शांती कायम राहते. आणि पती-पत्नीमध्ये प्रेमामध्ये गोडवा निर्माण होतो. वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालते. जीवनात येणारी संकट समाप्त होतात. भगवान भोलेनाथाची नित्यसेवा केल्याने देखील पारिवारिक जीवनामध्ये सुखशांती कायम राहते. वैवाहिक जीवन सुखी राहते. त्यामुळे भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना करणे हे देखील महत्त्वपूर्ण आहे.

दुसरे दान आहे ते म्हणजे मिठाचे दान मित्रांनो सोमवारच्या दिवशी जर आपण मीठ दान केले तर ते अतिशय उत्तम मानले जाते. मिठाचे दान हे अतिशय शुभ मानले जाते. पण मीठ दान करताना ते खरे मीठ असायला हवे जाडे मीठ असते ना ते जाडे मीठ असायला हवे किंवा आपण जे घरी खायला वापरतो ते पाकीट चे मीठ सुद्धा आपण दानामध्ये देऊ शकतो.

त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि घरामध्ये जीवनात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. सोमवारच्या दिवशी गाईला गुळरोटीचा नैवेद्य दिल्याने उद्योग व्यापारामध्ये भरभराट व्हायला वेळ लागत नाही. पारिवारिक जीवनामध्ये सुख-समृद्धीची बाहार यायला वेळ लागत नाही. गो मातेच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवन सुखमय बनते.

मैत्रीमध्ये किंवा प्रेमामध्ये आपले नाते बिघडले असेल तर प्रेम जीवनामध्ये काही तणाव निर्माण झाला असेल तर तो संपतो आणि प्रेमाचे नाते पुन्हा आणखी एकदा मधुर बनण्यास सुरुवात होते. गाईला गुळ आणि रोटीचा नैवेद दिल्याने आर्थिक समस्या देखील समाप्त होतात. माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर होते. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी समाप्त होते आणि उद्योग व्यापारातील पैशांची आवक वाढते. आपल्या कार्यक्षेत्रातून कमाई मध्ये वाढ होते.

जर आपल्या आत्मविश्वास खचला असेल आपण निराश बनला असाल उदास बनला असाल काही कारणाने आपण खचून गेला असाल आपलं मन अगदी निराश बनलं असेल जर एखादे अपयश आले असेल तर मित्रांनो सोमवारच्या दिवशी हा एक उपाय आपण करून नव्या आत्मविश्वासाची निर्मिती करू शकतो.

मित्रांनो सोमवारच्या दिवशी जर आपण तिळाचे दान केले, सोमवारच्या दिवशी तिळाचे दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानन्यात आले आहे. सोमवारच्या दिवशी जर आपण तीळ दान केले तर आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. एक नवी प्रेरणा प्राप्त होते आणि एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू व्हायला सुरुवात होते.

मोठे यश व्यक्तीच्या हाती लागतात. त्यामुळे सोमवारच्या दिवशी तिळाचे दान करणे शुभ मानण्यात आले आहे. यानंतर आहे पैशांचे दान सोमवारच्या दिवशी आपण एखाद्या गरजू व्यक्तीची सहाय्यता केली. कोणी गरजू व्यक्ती आपल्याकडे आली आणि आपण त्याला आर्थिक मदत केली तर त्याचे खूप मोठेपण आपल्याला प्राप्त होते.

मित्रांनो आपण केलेली छोटीशी मदत पुढे चालून खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला परत मिळते. त्यामुळे वेळोवेळी कुणाला कुणालाही गरज व्यक्तींना किंवा अतिशय अडचणीत आलेल्या व्यक्तीला आपण आर्थिक सहाय्यता करणे अतिशय शुभ मान्यता आले आहे. त्यामुळे भगवान भोलेनाथ फार प्रसन्न होतात आणि आपण केलेली छोटीशी मदत आपल्याला खूप मोठ्या स्वरूपात परत मिळते.

त्यामुळे यथाशक्ती पैशांचे दान करणे शुभ मान्य झाले आहे. त्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. जीवनामध्ये आपल्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही. पैसा कधीही कमी पडत नाही. पैशांचे दान करणे हे सुद्धा शुभ मानण्यात आले आहे. मित्रांनो जीवनात मानसन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त करायचे असेल तर आपल्यावर भगवान सूर्य देवाची कृपासणे अत्यंत आवश्यक आहे.

भगवान सूर्य देवाला ग्रहांचे राजा मानण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला जर आपला सूर्य मजबूत बनवायचा असेल तर मित्रांनो सोमवारच्या दिवशी आपल्याला गुळाचे दान करणे आवश्यक आहे. गरजू व्यक्तीला जर आपण सोमवारच्या दिवशी गुळदानाच्या स्वरूपात दिला तर मित्रांनो त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येतो.

आपला सूर्य मजबूत बनतो. सूर्य मजबूत बनल्यामुळे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होते. यश कीर्तीची प्राप्ती होते. सोमवारच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. मित्रांनो आता आपण पाहूयात की अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तू सोमवारच्या दिवशी जर आपण दान केल्या तर मित्रांनो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येऊ शकते.

मित्रांनो काही लोक असे असतात ते जर अन्नदान करत असतील किंवा धान्य जर दान करत असतील तर ते धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे म्हणजे खराब झालेले किडे लागलेले धान्य खराब झालेले धान्य दान करतात. हे अशुभ मानले जाते. त्यामुळे भगवान भोलेनाथ क्रोधित होतात आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते. त्यामुळे जेव्हा आपल्याला दान करायचे असेल तर थोडेसेच करा पण चांगले दान करा.

मित्रांनो बरेच लोक असे असतात की ते अनेक दिवसांच्या साठवलेले धान्य किंवा खराब झालेल्या टाकाऊ धान्य ते दान म्हणून देतात. पण अस धान्य दान करणे म्हणजे दूरभाग्याला आमंत्रण दिल्या समान आहे. अस दान दारिद्र्य घेऊन येते त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि चांगल अन्नदान करणे आवश्यक आहे. त्यासोबतच मित्रांनो फाटके वस्त्र किंवा जुने वस्त्र टाकाऊ वस्त्र दान करणे हे सुद्धा अशुभ मानण्यात आले आहे.

मित्रांनो फाटक्या तुटक्या चपलांचे किंवा जुन्या चपलांचे दान करणे हे सुद्धा अशुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये दारिद्र येऊ शकते. मित्रांनो कुणी कितीही मागितला तरी आपल्या घरचा झाडू कधीच कुणाला दान करू नये. घराचा झाडू दान करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखा आहे. घरच्या झाडू दान केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. आणि असे म्हणतात की माता लक्ष्मी आपले घर सोडून जाते.

त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र येऊ शकते. घरचा झाडू कधीच कुणाला दान करू नये. घरामध्ये उरलेले तेल सुद्धा दान करू नये. म्हणजे तळन खाल्ल्यानंतर जे तेल उडत ते तेल दान केल्याने शनिदेव क्रोधित होतात. त्यामुळे घरामध्ये दारिद्र येऊ शकते. शनीची अशुभ दृष्टी पडू शकते.

त्यामुळे असे तेल कधीही दानाच्या स्वरूपात देऊ नये. घरातील भांडीकुंडी सुद्धा दान करू नये. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. ऋष्ठ होऊ शकते. त्यासोबतच मित्रांनो धारदार वस्तूचे दान जसेकी चाकू ब्लेड यासारख्या वस्तूचे दान करणे हे देखील अशुभ मानण्यात आले आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *