अशा असतात सूर्यास्ताच्या वेळी जन्माला आलेल्या व्यक्ती.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजेच दिनांक त्या व्यक्ती बद्दल बरच काही बोलत असतो. पर्सनॅलिटी कशी आहे या बद्दल सुद्धा सांगत असतो. व्यक्तीचा स्वभाव हा रागीट असण किंवा शांत असण हे सगळं व्यक्तींच्या जन्मावर अवलंबून असते. म्हणजेच ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवसावर अवलंबून असत.

अशी मान्यता आहे की दिवसा ज्या व्यक्तीचा जन्म झाला. त्या थोड्या गरम स्वभावाच्या असतात. पटकन त्यांना राग येतो. नंतरच्या कोणत्याही वेळी जन्म झाले असेल तर ती व्यक्ती अजून वेगळा स्वभाव घेऊन येत असते. आज आपण खास करून सूर्यास्तानंतर जन्मलेल्या लोकांचा स्वभाव पाहणार आहोत.

या व्यक्तींच्या स्वभावावर चंद्र शुक्र आणि मंगळाचा प्रभाव हा जास्त दिसून येतो. याबरोबरच राहू आणि बुध हे सुद्धा या व्यक्तींवर प्रभाव पडत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर जन्मलेले लोक ही भाऊक स्वभावाची असतात. ही लोकं दुसऱ्यांवर फार पटकन विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच हा स्वभाव बराचदार त्यांना त्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांकडून फसवणूक करून घेण्यास पोषक ठरतो.

अगदी आयुष्याचा जोडीदार शोधताना सुद्धा ही लोकं भाऊ होऊन विचार करतात. संकुचित आणि लाजाळू स्वभावामुळे ही लोक आपली मत सुद्धा नीट मांडू शकत नाही‌. आयुष्यात प्रगती करण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी घेतलेली मेहनत ही सुद्धा इतरांसोबत मांडणे ही एक कला आहे आणि याबाबतीत ते थोडेसे चुकतात. त्यामुळे त्यांना हवा तो निकाल मिळत नाही. बौद्धिक दृष्ट्या ही लोक खूप हुशार असतात.

सूर्यास्त जसा येणाऱ्या नव्या दिवसाचा संकेत देत असतो. अगदी त्याप्रमाणे ही लोक आशावादी सुद्धा असतात. बऱ्याच व्यक्ती या आपल्या हुशारीने डोक्याचा योग्य वापर करत इतरांपेक्षा पुढे जात असतात. तसेच सूर्यास्तानंतर जन्माला येणारी ही लोक दूरदर्शी स्वभावाची सुद्धा असतात. बरेच जण आयुष्यात पुढे जाताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत असतात.

पण अति विचाराने ही लोक स्वतःलाच त्रास करून घेत असतात. या व्यक्ती जीवनात व्यवहारिक आणि सतत सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांना भेटतील त्यांना आपलंसं करण्यात या व्यक्ती पटाईत असतात. इतरांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ही लोक विचार करण्याची क्षमता ठेवतात. या लोकांना वर्तमानात रहायला खूप आवडत. नेहमी अपडेट राहायला आवडत.

यांच्यात एक प्रकारे चांगली लीडरशिप क्वालिटी असते.त्यांचे विचार करण्याची पद्धत त्यांना नेहमी सगळ्यांपेक्षा पुढे ठेवते. अर्थात मित्रांनो ज्योतिष शास्त्र हे निष्कर्ष काढत असत. त्या त्या व्यक्तीचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर बघून व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे वर दिलेले गुणवैशिष्ट्य सगळ्यांनाच लागू होत नसतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *