आज शनि अमावस्या गाईला खाऊ घाला ही १ वस्तू आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि काही विशिष्ट दिवसांमध्ये जर अमावस्या आली तर ती अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणजे जसे की शुक्रवारी सोमवारी किंवा शनिवारी जर अमावस्या तिथी येत असेल तर ती अतिशय शुभ फलदायी मानली जाते. या दिवसांमध्ये येणारी अमावस्या ही अतिशय लाभदायक मानली जाते आणि या दिवसांमध्ये अनेक उपाय देखील केले जातात.

आपल्या दुर्मिळ ग्रंथांमध्ये असे अनेक उपाय सांगते सांगितलेले आहेत किंवा आपल्या पूर्वजांनी परंपरागत चालत आलेले अनेक उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. जे अमावस्येच्या दिवशी करायचे असतात. तसे की दानधर्म पिंडदान तर्पण स्नान दक्षिणा वगैरे असे अनेक उपाय अशा अनेक गोष्टी या अमावस्येच्या दिवशी करायला सांगितल्या जातात. किंवा आवर्जून केल्या जातात.

काही लोक या दिवशी हनुमानजींना नारळ फोडतात किंवा शनि देवाला तेल अर्पण करतात. या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि शनी अमावस्या ही तर अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. शनी अमावस्येला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. दिनांक २७ ऑगस्ट रोजी शनी अमावस्या येत आहे. मित्रांनो हे पिठोरी अमावस्या शुक्रवार आणि तसेच शनिवारच्या दिवशी येणार असल्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते.

त्यामुळे या दिवशी शनि देवाची पूजा करणे शुभ मानले जाते. शनीला तेल अर्पण करणे किंवा शनीच्या नावाने काळे तीळ काळे उडीद काळे कापड दान करणे शुभ मानले जाते. तसेच मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार गाईला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. गाईला माता मानन्यात आले आहे .असे म्हणतात की गाई मध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो. ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते.

काही अन्नपूर्णा मानण्यात आली आहे. मान्यता आहे की आपण सकाळी स्वयंपाक घरात जी पहिली पोळी बनवतो. ती पोळी जर आपण गायला खाऊ घातली तर त्यापासून आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतात. गाईला गुरुग्रह संबंधात जोडले गेले आहे. त्यामुळे आपल्याला जर आपला गुरु ग्रह शुभ किंवा प्रबळ हवा असेल तर गायीची सेवा करणे हे शुभ मानण्यात आले आहे.

अशावेळी गाईला रोटी देताना किंवा गाईला पोळी देताना थोडासा गुळाचा तुकडा आणि थोडीशी हळद म्हणजे एक चिमूटभर हळद त्या पोळीवर ठेवून जर आपण गाईला खाऊ घातली तर त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील गुरु प्रबळ बनतो. गुरुच्या आशीर्वादाने मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध बनते. व्यक्तीला सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होते. जर आपल्याला असे वाटत असेल की भाग्य आपल्याला साथ देत नाही.

आपल्या जीवनामध्ये अतिशय ग्रहांची अशुभ स्थिती आहे. ग्रहांची नकारात्मक स्थिती आहे. आपली ग्रहदशा वाईट आहे असे जर आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो आपण जी पहिली पोळी बनवतो ती पोळी आपण गायला खाऊ घातली पाहिजे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. नकारात्मक ग्रहदशा बदलते आणि हळूहळू सर्व ग्रह शुभ बनायला लागतात.

गाईला गुळ आणि रोटी खाऊ घातल्याने आपली मनोकामना देखील पूर्ण होते. मित्रांनो आपण जर एखादी मनोकामना व्यक्त केली आणि गाईला गुळरोटीचा नैवेद्य दिला आणि त्यावेळी एखादा नवस बोलला तर तो लवकर फलित होतो. मित्रांनो गाईला तर अनेक जण रोटी खाऊ घालतात. पोळी खाऊ घालतात. पण मित्रांनो खराब झालेली भाकरी, टाकाऊ भाकरी, टाकाउ खराब झालेले विटलेल अन्न किंवा सरलेला अन्न अस अन्न लोक गायला खाऊ घालतात.

त्यामुळे मित्रांनो गाईच्या शरीरामध्ये असणाऱ्या देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी येण्याऐवजी दारिद्र्याचा सामना व्यक्तीला करावा लागतो. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण गाईला खाऊ घालाल. तर ती ताजी पोळी किंवा ताजी रोटी द्या. ताजा नैवेद्य गाईला दिल्याने ३३ कोटी देव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धीचे दिवस यायला सुरुवात होते. घरामधील नकारात्मक वातावरण दूर होते. मित्रांनो दररोज सकाळी नित्यनेमाने गाईला स्पर्श केला किंवा गायीच्या अंगावरून हात फिरवला तर आपल्या शरीरातील अनेक रोग आपोआप बरे होतात. आणि दररोज गायीच्या संपर्कात राहिल्यामुळे शरीर निरोगी बनते. सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते. व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.

गाईचे गोमूत्र हे अतिशय पवित्र मानले जाते. नकारात्मक शक्तीचा नाश करून घराला ते शुद्ध तर करतेच पण गाईचे थोडेसे गोमूत्र सकाळी आपण प्राशन केले तर मित्रांनो शरीर सुद्धा निरोगी बनते. शरीर सुद्धा शुद्ध होते. शरीरातील अनेक रोग बरे होतात. घरामध्ये नित्यनियमाने गोमूत्र शिंपडल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते.

मित्रांनो जर आपण एखाद्या महत्त्वपूर्ण कामाला जात असाल आणि रस्त्याने जाताना जर गाय आपल्याला आडवी आली तर समजून जा की हा अतिशय शुभ शकुन आहे. आणि आपले काम पूर्ण होणार किंवा रस्त्याने जात असताना गाय आणि वासरू आपल्याला एकत्र दिसले किंवा गाय व आपल्या वासराला पाजताना जर आपल्याला दिसली तर समजून घ्या की हा अतिशय शुभ संयोग आहे.

मित्रांनो अनेकांचा अनुभव आहे की गाईच्या सहवासात राहिल्याने व्यक्तीच्या डोक्यात डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक विचारांची निर्मिती होते. गाय जीवन जगण्याचे बळ देते. जर एखादी काळी कपिली गाय आपल्या घराभोवती फेऱ्या मारत असेल घराभोवती फिरत असेल तर हा अतिशय शुभ संकेत जाणावा.

आयुर्वेदामध्ये गोमूत्र गाईचे दूध दही टाक लोणी तुप आणि गाईचे शेण सुद्धा वापरले जाते. या पंचगव्यामध्ये खूप मोठी शक्ती असते. अनेक रोग त्यामुळे दूर होतात. जरी आपण गाय पाळू शकत नसाल तरी गाईला नैवेद्य तरी देऊ शकता. रोटी तरी देऊ शकता. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की गाईची सेवा करणाऱ्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने बहरलेले असते.

मित्रांनो शास्त्रानुसार जर आपण पूजा पाठ करू शकत नसाल. जर आपण देवधर्म करू शकत नसला तर आपण तीर्थाला देखील जाऊ शकत नसाल आपल्याला आपल्या ग्रह दोषाविषयी कुठे जाऊन ग्रह दोष दूर करण्याविषयी विधी करू शकत नसाल. उपाय करू शकत नसाल तर मित्रांनो हा एकदम साधा आणि सोपा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे.

गाईला अमावस्येच्या दिवशी नित्यनेमाने गुळ रोटीचा नैवेद्य दिल्याने आपल्या जीवनातील सर्व ग्रह दोष हळूहळू दूर होण्यास मदत होईल. मित्रांनो गाईमध्ये ३३ कोटी देवांचा अवास असतो. त्यामुळे गाईच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व ग्रहदशा सुरळीतपणे चालू लागेल आणि जीवन सुखी राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *