श्रावणी गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग या राशींसाठी ठरणार आहे लकी. जुळून येत आहे आता भाग्योदय.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. आणि हा खूप शुभ मानला जातो. येत्या गुरुवारी अर्थात २५ ऑगस्टला हा योग जुळून आला आहे. गुरुवार हा दत्तगुरूंची आणि गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीची कृपा मिळून देणारा योग आहे. आणि त्यामुळेच तो ६ राशींसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.

मेष राशी- ठरवलेली काम होतील. तसेच जुनी येणी वसूल होतील. गुरुपुष्यामृत योगावर नवीन वस्तूंची खरेदी कराल. या वस्तू दीर्घ काळ लाभ देतील. दत्तकृपेने मन शांत राहील आणि नवीन कामाची सुरुवात कराल.

वृषभ रास- गुरुपुष्यामृत योगावर नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. जिथे तुम्ही दीर्घ काळापासून वाट बघत आहात. ती संधी ओळखा आणि संधीचं सोनं करा. नव्या लोकांची भेटीगाठी होतील आणि त्या सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आता वळूया सिंह राशी कडे

सिंह राशी- गुरुपुष्यामृत योगावर सोन खरेदी करण्याचा योग आहे. तुम्ही सुद्धा या योगावर एक ग्रॅम का होईना पण सोनं अवश्य खरेदी करा. या योगावर केलेली खरेदी तुमच्यासाठी फलदायी ठरेल आणि तुमच्या संपत्ती मध्ये वाढ होईल. भरभराट होईल आणि म्हणून या योगावर काही ना काहीतरी नक्की खरेदी कराल.

कन्या रास- कन्या राशीसाठी हा योग आनंददायी ठरेल. आनंदी वार्ता कानावर येतील. दत्तकृपेने जुने वाद संपुष्टात येतील. हितशत्रू माघार घेतील. वाहन यंत्र आणि अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस लाभदायक ठरेल.

धनु रास- धनु राशीला गुरुपुष्यामृत योगावर धनलाभ होण्याचे संकेत आहेत. हा दिवस तुमच्यासाठी काहीतरी शुभ वार्ता घेऊन येईल. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी होतील पण माता लक्ष्मीचा स्तोत्र पठण करा तुमची मनोकामना पूर्ण होईल.

मकर रास- मकर राशीची थांबलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल यशाचे नवे मार्ग खुले होतील. दत्त उपासनेचा लाभ होईल. या योगावर केलेले कोणतेही काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर मंडळी या होत्या त्या सहाराशी ज्यांना या गुरुपुष्यामृत योगाचा फायदा होणार आहे. मग तुमची रास यामध्ये आहे की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका.

आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी तुमची रास यामध्ये नसली तरी सुद्धा गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही काही ना काही तरी छोटीशी खरेदी नक्की करा. की तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुरुपुष्यामृत योगावर विशेष साधना तुम्ही केली तर त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल. अगदीच काही खरेदी करणे तुमच्यासाठी शक्य नसेल तर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करा.

माता लक्ष्मी आपल्या भक्तांना कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही. तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा जप करू शकता. किंवा महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दत्तगुरूंची उपासना सुद्धा करू शकता. कारण गुरुवार हा दत्तगुरूंचाच वार असतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *