सत्यघटना या मुलाची दुःखद कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल…..!

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आज मी तुम्हा सर्वांसाठी सत्य घटनेवर आधारित खूप छान सुंदर अशी एक कथा घेऊन आली आहे. आणि या कथेच्या लेखिका आहेत आदरणीय सौ सोनवणे मॅडम. ही कथा अगदी शेवटपर्यंत वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग कथेला सुरुवात करुया.

तर काही मुले खेळत होती आणि दोन तीन मुले वर्गात लिहित बसली होती. पण त्यापैकी संदीप माझ्यासोबत बसलेला होता तो खाली पाहून लिहीत होता. पण जरा अस्वस्थ वाटला त्याला विचारले संदीप बरं वाटत नाही का शांत शांत का आहेस तर लगेचच त्याचे डोळे भरून आले.

अरे का रडतो याला कोणी मारले का रे काय रे संदीप सांगना काय झाल. मग तर तो जोरजोरात रडू लागला. मी त्याच्या जवळ गेली तेव्हा शेजारी उभा असलेला रुद्र बोलला मॅडम त्याची आई चक्कर येऊन चुलीजवळ पडली. घरात कोणीच नव्हतं सर्व शेतात गेले होते. ती पण भाकरी घेऊन शेतात जाणार होती.

पण त्यांना अचानक चक्कर आली त्या पडल्या बराच वेळानंतर शेजारच्या आजीने त्यांना पाहिलं तेव्हा सर्वांना समजल. दवाखान्यात नेलं त्यांना भाजलं डोक्याला लागला आहे. हे ऐकून खूप वाईट वाटलं. त्याच्या आईला कॉल करण्यासाठी नंबर विचारला तर तो बोलला मम्मी जालना येथे आहे.

तिच्याकडे मोबाईल नाही वडिलांकडेही मोबाईल नाहीये ते दुसर्याच्या मोबाईल वरून कॉल करतात. आज शाळेत असताना त्यांना त्याच्या आईचा कॉल आला होता हॅलो मॅडम मी संदीपची आई बोलतेय. संदीपला दयाना कॉल सासूबाईंचा कॉल आला होता. त्यांनीच सांगितलं की मॅडम तुला विचारत होत्या. मी संदीपलि मोबाईल दिला तो नुसता ह्म्म ह्म्म करत होता.

डोळ्यातून टपटप पाणी पडत होते अधून मधून आवाज कट होत होता. म्हणून कॉल स्पीकर वर टाकलेला होता. तिकडून आई संदीपला मायेन समजावत बोलत होती व हीकडे माझा सर्व वर्ग रडत होता सर्वांचे डोळे डबडबून गेले होते. संदीपचे बोलून झाल्यावर मी त्यांची चौकशी केली तेव्हा समजले की त्यांची एचडी फक्त पाच पॉईंट आहे.

अचानक त्यांच्या मेंदूची एक नस बंद पडते. अजून बरंच काही तरी शेवटी कॉल ठेवताना त्या एक वाक्य बोलल्या मॅडम माझ्या संदीपला तुम्ही आईसारखे सांभाळले तो घरी राहत नाही. शाळा बुडते म्हणून तुम्ही सांगितल्यावर तो जेवतो तुमचं सगळं ऐकतो.

मी येऊस्तोवर आता तुम्ही ध्यान द्या त्याच्याकडे मी त्यांना काळजी करू नका. बोलले खरं पण मला खरंच त्याच्या आईची काळजी वाटते. त्या लवकर बऱ्या व्हायला हव्यात बिचाऱ्या संदीपसाठी नेहमी शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई व्हावे लागते. बरोबरना मित्रांनो तुम्हाला माहीती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा, धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *