नमस्कार मित्रांनो.
दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमी स्थापन श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या सालात पंचांग भेदामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की १८ ऑगस्ट गुरुवारी आहे की १९ ऑगस्ट शुक्रवारी याबाबतीत अनेक जण गोंधळलेले आहेत.
मित्रांनो कृपया मनात कोणताही गोंधळ किंवा कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका आणू नका. कारण यावर्षीच्या अष्टमी तिथीचा प्रारंभ गुरुवारी रात्री ०९:२१ मिनिटांनी होतो आहे. आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी रात्री १०:५९ मिनिटांनी होते आहे. आणि दरवर्षी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा मध्यरात्री बारा वाजता साजरा करण्याची प्रथा आहे.
त्यानुसार जर रात्री बारा वाजता हा उत्सव साजरा करावयाचा असेल तर त्यासाठी गुरुवारी मध्यरात्री बाराची वेळ ही सर्वोत्तम आहे. थोडक्यात गुरुवार १८ ऑगस्ट चा दिवस हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस मानला जाईल. याउलट जे लोक विशेष करून उत्तर भारतामध्ये सूर्योदय व्यापिनी तिथीचा विचार करतात.
म्हणजे अशी तिथी की ज्या तिथीला सूर्य उगवतो आहे. सूर्योदय होतो आहे. तर त्यांच्यानुसार मात्र १९ ऑगस्ट शुक्रवारचा दिवस हा त्यांच्यासाठी अतिउत्तम राहील श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी. मित्रांनो आणि यामध्ये तिसरा भाग असा आहे की श्रीकृष्णांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावर झाला होता.
मात्र यंदाच्या वर्षी १८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट या दोन्ही दिवशी रोहिणी नक्षत्र लागणार नाही. ते शनिवारच्या दिवशी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी असणार आहे. आणि म्हणून मनात कोणतीही शंका कुशंका न आणता आपण गुरुवार असेल किंवा शुक्रवार असेल यापैकी कोणत्याही दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू शकता.
आपल्या मनामध्ये भक्ती भाव किती आहे. श्रद्धा किती आहे. आपण भगवान श्रीकृष्णांना किती विनम्रपणे शरण जात आहोत या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो आजचा आपला विषय आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन मुहूर्तावरती पावन उत्सवाच्या दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी अगदी अवश्य करावी. आणि या वस्तू खरेदी करून घरी आणाव्यात.
मित्रांनो यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीस काही अत्यंत शुभ संयोग जुळून आलेले आहेत. या जन्माष्टमीस वृद्धी योग असेल ध्रुव योग असेल यासारखे अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहेत. की जे माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी अतिउत्तम मानले जातात. आणि म्हणून या पाच-सहा वस्तूंपैकी जितक्या वस्तू खरेदी करून घरी आनन शक्य असेल त्या वस्तूंची खरेदी आपण या दिवशी नक्की करा.
श्रीकृष्ण जन्माष्टमीस खरेदी करावयाच्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे गाय बछड्याची मूर्ती होय गाय आणि तिचा बचडा यांची मूर्ती किंवा यांचा फोटो आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीस नक्की खरेदी करा. आणि आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याची स्थापना करा. ईशान्य कोपरा कोणता पूर्व आणि उत्तर या दोन दिशांच्या मधली जी दिशा आहे तिला ईशान्य अस म्हणतात. आणि ही देवी देवतांची दिशा आहे.
मित्रांनो अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीस गाय बछड्याची मूर्ती किंवा फोटो घरात आणल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात. कारण त्यांचा वासच गोलोकात आहे. या गोलोका मध्ये म्हणजेच या गाईमध्ये ३३ कोटी देवी देवता वास करतात. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीस केलेली गाय बछड्याची पूजा ही घरामध्ये समृद्धी निर्माण करते.
आपल्या कुंडलीतील गुरु ग्रहाला मजबूत बनवते. जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह अशुभ स्थितीत असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. दैनिअवस्था गरीबी येते. प्रत्येक कामामध्ये अपयशच अपयश येत. घरामध्ये सतत आजारपण वाटू लागत. आणि म्हणून गुरूला प्रबळ करण्यासाठी आपण ही मूर्ती खरेदी करू शकता.
ज्यांची क्षमता असेल त्यांनी चांदीची मूर्ती या दिवशी आवर्जून खरेदी करावी. किंवा आपण मातीची सुद्धा खरेदी करू शकता. फोटो सुद्धा खरेदी करू शकता. मित्रांनो आपणास माहीत असेल की प्राचीन काळी गाईला धन मानल जायच. ते धनाच एक मोठ प्रतीक होत. आणि म्हणून वास्तुशास्त्र सुद्धा अस माणत की या गाईची मूर्ती घरात असण हे सुख सौभाग्याला आपल्या वास्तूकडे आकर्षित करत.
मित्रांनो जर आपण दुसऱ्या वस्तूकडे पाहिल तर दुसरी वस्तू की जी आपण या जन्माष्टमीस नक्की खरेदी करावी. ती आहे मोरपंख भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मस्तकी या मोरपंखास धारण केलेले आहे. आणि म्हणून त्यांची पूजा करताना आपन मोरपंखाचा वापर या दिवशी नक्की करा. अनेक जण भगवान श्रीकृष्णांचा श्रीकृष्ण जन्माष्टमी शृंगार करतात. आणि हा शृंगार करताना मोरपंख असणे अनिवार्य मानल जात.
ज्या राधा राणी आहेत एक अशी प्राचीन कथा आहे की राधा राणी ज्या महालात राहत होत्या त्या महालामध्ये अनेक प्रकारचे मोर यायचे आणि जेव्हा श्रीकृष्ण श्रीहरी बासरी वाजवायचे त्या बासरीची धून ऐकून केवळ राधा राणीच नव्हे तर हे मोर सुद्धा नृत्य करू लागत. आणि असेच एकदा हे नृत्य करत असताना मोराचा पंख जमिनीवर पडला. आणि हाच पंख राधा राणीच्या प्रेमाच प्रतीक म्हणून श्रीकृष्णाने आपल्या मस्तकी धारण केला. तू अगदी जीवनाच्या अंतिम क्षणा पर्यंत.
मित्रांनो मोरपंख हे श्रीकृष्णांनी राधा राणी यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. तर असा हा मोरपंख आपण आपल्या घरामध्ये नक्की लावा. अगदी घरातील प्रत्येक खोलीमध्ये आपण लावू शकता. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर की ज्या ज्या दारातून घरात प्रवेश करतो अशा मुख्य प्रवेशद्वारावर दरवाजावर आपण हा मोर पंख लावू शकता.
ज्योतिष शास्त्र असं मानत की मोरपंख ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अमंगळ गोष्टी घडत नाहीत. चुकीच्या गोष्टी अशुभ गोष्टी घडत नाही. जे काही दुरात्मे असतात. म्हणजेच जे काही वाईट आत्मे असतात. कोणत्याही प्रकारची बाधा वगैरे त्या घरातील लोकांना होत नाही. अनेक प्रकारच्या वास्तुभोषातून सुद्धा यामुळे मुक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा सातत्याने आपल्या वास्तूकडे खेचली जाते.
जेणेकरून त्या वास्तुत राहणाऱ्या लोकांना सुखस सौभाग्य आणि आरोग्याची प्राप्ती सुद्धा होते. आणि म्हणून असा हा अत्यंत शुभ मोरपंख आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीस आपल्या घरी नक्की घेऊन या. मित्रांनो तिसरी वस्तू आहे बासरी म्हणजेच पावा आपणास माहीत असेल की भगवान श्रीकृष्णांचा या बासरी सोबत अत्यंत जवळच नात आहे.
गोकुळातील ज्या गोपी होत्या त्या बासरीच्या आवाजानेच भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित व्हायच्या. त्या नृत्य करू लागत बासरी हे प्रेमाच आणि आनंदाचे प्रतीक आहे. जे भगवान श्रीकृष्णांची रासलीला आहे. त्या त्रासलेले मध्ये सुद्धा या बासरीचे महात्म्य अगदी अनन्यसाधारण आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये प्रेमाचा संचार करण्याची ताकद भगवान श्रीकृष्णाच्या बासरीमध्ये होती.
म्हणून अशी ही बासरी आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये लावल्यास वास्तुतील वास्तुदोष तर दूर होतातच मात्र सोबत जर पती-पत्नीमध्ये सातत्याने वादविवाद होत असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या उषाजवळ एक बासरी नक्की घेऊन ठेवावी आणि झोपी जाव. एक बासरी पतीच्या उशाला एक बासरी पत्नीच्या उशाला.
अशीही मान्यता आहे की भगवान श्रीकृष्ण जेव्हा ही बासरी वाजवायचे तेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये एक प्रकारचा चैतन्य निर्माण व्हायच. मित्रांनो अशी ही बासरी आपल्या घरात लावताना लक्षात ठेवा ती नेहमी तिरपी लावावी ती उभी राहू नये. आणि तिचा तोंड हे नेहमी खालच्या बाजूला असायला हव. विशेष करून आपल्या घरामध्ये आपण जास्तीत जास्त काळ ज्या ठिकाणी व्यतीत करतो.
जिथे लोक आपल्या घरातील लोक जास्त काळ एकत्र बसतात अशा रूममध्ये ही बासरी लावल्यास त्याचे फायदे खूप लवकर दिसून येतात. अनेक लोक या श्रीकृष्ण जन्माष्टमीस मोर मुकुट खरेदी करताना आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्पण केला जातो. यामुळे कालसर्प दोष दूर होतो अशी प्राचीन मान्यता आहे. तर हा मोर मुकुट सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकता.
मित्रांनो भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवताना आपण लोण्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य नक्की दाखवा. हा नैवेद्य भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. अनेक लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी पाळणा सुद्धा एखाद्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये भेट देतात. त्यांनी सुद्धा कृष्णाची कृपा प्राप्त होते. अशी प्राचीन मान्यता आहे.
मित्रांनो या दिवशी आपण भगवद्गीते सारखा ग्रंथ सुद्धा नक्की खरेदी करावा आणि तो आपल्या घरात कायमस्वरूपी जतन करावा. भगवद्गीता हा म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे. मुक्तीचा मार्ग आहे. कर्माचा पथ आहे. आणि या जन्माष्टमी स्थापनेला त्यातील किमान एक अध्याय हा नक्की वाचावा. त्या अध्यायाचा पाठ करावा.
जेणेकरून भगवान श्रीकृष्णाच अनमोल ज्ञान हे आपणास प्राप्त होईल. तर मित्रांनो अशा या काही वस्तूंची खरेदी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीस नक्की करा. भगवान श्रीकृष्णाची असीम कृपा आपल्यावरती नक्की भरसो. अशा आपणा सर्वांना या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.