नमस्कार मित्रांनो.
हरी ओम नमो नारायणा १८ ऑगस्ट गुरुवारचा दिवस आणि या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे.श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार धारण केला तो दिवस. मित्रांनो या दिवशी आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा एक छोटासा उपाय अवश्य करा.
आपल्या घराजवळ जर भगवान श्रीकृष्णांचे मंदिर असेल किंवा भगवान श्री रामचंद्र यांचे मंदिर असेल किंवा श्री हरी श्री विष्णू मंदिर असेल तर अशा मंदिरामध्ये जाऊन आपण हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला ४१ चणाडाळ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घ्यायचे आहेत.
आपण स्वयंपाकामध्ये जी हरभरा डाळ वापरतो चणाडाळ तिचे फक्त ४१ दाणे मोजून घ्यायचे आहेत. किंवा आपण अंदाजे मुठभर दाणे सुद्धा मुठभर डाळ सुद्धा घेऊ शकता. आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आपण ही डाळ टाकायची आहे आणि त्या कपड्याची पोटली म्हणजेच फुरसुंडी बांधायची आहे.
जवळ पासच्या भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या भगवान श्रीकृष्णांच्या किंवा प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिरात जायच आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली आपण धरा आणि आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे लक्षात ठेवा मनोकामना एकच असावी अगदी कोणतीही इच्छा घरात पैसा टिकत नाही. माता लक्ष्मीचा तुमच्या घरात वास नाहीये. किंवा तुमच्या घरात सतत आजारपण आहे.
तुमच्या घरातल्या लोकांना आरोग्याची प्राप्ती होत नाही. उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाही, म्हणजे म्हणजे कोणतीही जी तुमची समस्या आहे. तुमची व्यवस्थित रित्या समस्या दूर व्हावी अस तुम्हाला मनो मन वाटत ती तुमची इच्छा आणि ही पोटली आपल्या हातामध्ये धरून व्यक्त करायची आहे. बोलायची आहे. आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांचे नाव घ्यायच आहे किंवा आपण ओम नमःशिवाय अस सुद्धा म्हणू शकतो.
अनेक लोकांना प्रश्न पडेल की भगवान श्रीहरींच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये आपण शिवशंकरांचे नाव कस बर घेऊ शकतो. मित्रांनो हा पवित्र श्रावण महिना चालू आहे. तुम्हाला माहित असेल की देव शैली एकादशी भगवान श्रीहरी श्रीविष्णु क्षीरसागरा मध्ये शेषनागावर निद्रिस्त होता. आणि या सृष्टीच संचालन करण्याचा संपूर्ण भार हा भगवान शिव शंकरांच्याच डोक्यावर आहे. त्यांच्याच खांद्यावर आहे.
आणि म्हणून शिवशंकरांचा सर्वात प्रिय महिना चालू आहे श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यातीलच कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीस भगवान श्रीकृष्णांचा अवतार या ठिकाणी या भूलोकी त्यांनी अवतार धारण केला होता. तेव्हा मनामध्ये कोणतीही शंका न आणता आपण शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी केवळ शिवशंभो शिवशंभो किंवा शिवशंकर किंवा ओम नमः शिवाय असा कोणताही मंत्र म्हणू शकता.
शिव शंकरांचे महादेवांचे नाव घेतल तरीही पुरेस आहे. महिलांनी नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करण्यास हरकत नाही. कमीत कमी ४१ वेळा म्हणजे एक दोन तीन मिनिटे किंवा पाच मिनिटे आपण अंदाजे शिवशंभोंचं नाव घ्यायच आहे. मंत्र जप करायचा आहे आणि आपली ही इच्छा पूर्ण होऊ देत अशी मनोकामना शिव शंकरांच्या चरणी आणि ज्या मंदिरात तुम्ही गेलेला आहात तिथे जे देवता आहे.
प्रभू श्री रामचंद्र असतील, श्रीकृष्ण त्यांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आणि ही पोटली तिथे जे कोणी पुजारी असतील किंवा एखादी जी काही विद्वान व्यक्ती तिथे असेल तर त्या व्यक्तीकडे आपण ही पोटली द्यायची आहे आणि त्यांना ती भगवंतांच्या चरणी ठेवण्यास सांगायची आहे.
मित्रांनो गुरुवारच्या दिवशी केलेला हा छोटासा उपाय कारण यंदाची श्रीकृष्ण जन्माष्टमी काही ठिकाणी गुरुवारी साजरी केली जाणार आहे. काही ठिकाणी शुक्रवारी होईल. याविषयीचा संपूर्ण विवेचन आम्ही केलेल आहे. तेव्हा या दोन्ही दिवशी साजरी केलेली श्रीकृष्ण जन्माष्टमी ही ग्राह्य धरण्यात येते. धर्मशास्त्राने पंचांग भेदामुळे त्यास परवानगी दिलेली आहे.
तेव्हा मनामध्ये किंतु परंतु आणू नका आणि असा हा छोटासा उपाय अगदी पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने करा. भगवान श्री श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या मनातील ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. यामध्ये शंका नाही. आणि हो हा उपाय आपण संपूर्ण दिवसभरात किंवा रात्रभरात कधीही करू शकता. अगदी कोणत्याही वेळी.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.