श्रावण विशेष- फक्त दोन थेंब दूध महालक्ष्मी होईल प्रसन्न, मिळेल कृपाशिर्वाद.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल घर नीटनेटके स्वच्छ असाव अस सगळ्यांनाच वाटत. आणि यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. खास करून घरातल्या स्त्रिया घराची स्वच्छता करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. घर स्वच्छ सुंदर दिसाव यासाठी हातात झाडू घेऊन तयारच असतात. संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात झाडू मारतात परंतु तुम्हाला हे माहिती आहे का?

की घरातील एक अशी जागा आहे तिथे झाडूचा स्पर्श अजिबात होऊ देऊ नये. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. आपण घराची स्वच्छता करताना बेडरूम देवघर प्रत्येक रूम चकचकीत करतो पण अशी एक जागा आहे की जिथे झाडूचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणती आहे ती जागा चला जाणून घेऊया.

ती जागा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. या घराची मर्यादा म्हणजे आपला उंबरठा. आणि म्हणूनच साफसफाई करताना उंबरठ्याला चुकूनही झाडूचा स्पर्श होऊ देऊ नये. अस म्हटल जात. झाडू म्हणजे माता लक्ष्मी आणि उंबरठा म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि म्हणूनच उंबरठ्याला कधी झाडू म्हणून मारू नये. कारण उंबरठ्याला झाडू मारण्याचा अर्थ असतो.

आपण भगवान श्रीहरी विष्णूंना घराबाहेर जायला सांगत आहोत. आणि जिथून भगवान श्रीहरी विष्णू निघून जातात. आणि मग घरात आर्थिक समस्या सुरू होतात. मग उंबरठा स्वच्छ कसा करायचा तर एखाद्या फडक्याने तो पुसून घ्यावा. पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य द्वाराचे फार महत्त्व होते. त्यावेळी घरोघरच्या मुख्य द्वाराचे पूजनही केले जात होते.

घराच्या द्वारावर गणपती बाप्पाची स्थापना ही केली जायची. आणि शुभ लाभ अशी चिन्ह ही काढलेली असतात. रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडून तो स्वच्छ पुसून काढावा. त्यावर रांगोळी काढली पाहिजे. हळद कुंकू आणि त्याच पूजनही केल पाहिजे.

म्हणजे घरात कोणतीही नकारात्मक परिस्थिती प्रवेश करू शकणार नाही. उंबरठा दररोज स्वच्छ केल्यानंतर त्याच्यावर लगेच दोन थेंब दूध टाकावे. जास्त टाकू नये, परंतु रोज न चुकता दोन थेंब दूध टाकावे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते अस म्हणतात.

मंडळी त्याचबरोबर तुम्ही गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचे लेपन करून त्याची पूजा सुद्धा करू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला आर्थिक दृष्ट्या फायदा होतो. असं वास्तुशास्त्रानुसार सांगितल जात.

मंडळी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा एक हमखास उपाय म्हणजे घरात महालक्ष्मी अष्टकाचा रोज पाठ करावा. महालक्ष्मी अष्टक म्हणायला अतिशय सोपा आहे. आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *