११ ऑगस्ट रक्षाबंधन या वेळेत चुकूनही बांधू नका राखी, भाऊ बरबाद होईल. आयुष्यभर

Astrology

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण. म्हणजे रक्षाबंधन यंदा म्हणजेच २०२२ या सालात रक्षाबंधनाचा सण ११ ऑगस्ट गुरुवारी आलेला आहे. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधते. आणि भावाकडून आपलं रक्षण करण्याचे अभिवचन घेते. भाऊ सुद्धा आपला हा धर्म अगदी आयुष्यभर निभावत असतो. आपल्या बहिणीचे रक्षण करत असतो. मित्रांनो दरवर्षी नारळी पौर्णिमेस आपण रक्षाबंधन साजरी करतो.

यंदा नारळी पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी प्रारंभ होत असून तिची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ ऑगस्ट शुक्रवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी होत आहे. रक्षाबंधनाचा सण ११ ऑगस्ट गुरुवारी आपण साजरा करत आहोत. मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे रक्षाबंधनाचा सण आहे या दिवशी बहिणींनी भद्रा काळामध्ये आपल्या भावांना चुकूनही राखी बांधू नये.

भद्रा काळात राखी बांधल्यास केवळ भावाच्या असते तर बहिणीच्या सुद्धा आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. यासंबंधी हिंदू धर्म शास्त्राने सांगितलेली आहे की रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळातच राखी बांधून घेतली होती आणि म्हणूनच रावणाच्या प्रचंड साम्राज्याचा विनाश झाला. भद्रा ही आहे तरी कोण भद्रा ही सुर्यदेवांची पुत्री. सुर्यदेवांना शनिदेव आणि भद्रा अशी दोन मुल आहेत. भद्रा ही यांची पुत्री आहे. सूर्यदेव आणि छाया यांची ही पुत्री.

जेव्हा ती आईच्या गर्भातून बाहेर पडली तेव्हा संपूर्ण सृष्टी मध्ये कोलाहल माजला हाहाकार माजला. ज्या ज्या ठिकाणी शुभ कर्म चालू होती ज्या ठिकाणी पवित्र गोष्टी मंगल गोष्टी चालू होत्या त्या सर्व गोष्टी या भद्रेच्या प्रभावाने अशुभ ठरल्या. त्यातून केवळ अशुभ आणि अशुभच जन्मास आले. आणि म्हणूनच तेव्हापासून भद्रा काळामध्ये कोणतेही शुभकार्य करण हिंदू धर्मात वर्जित मानल आहे.

आज आपण जाणून घेणार आहोत की रक्षाबंधनाच्या दिवशी हा भद्रा काळ कधी आहे की ज्यामुळे बहिणीने आपल्या भावांना चुकूनही राखी बांधू नये. मित्रांनो त्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट यंदाच्या रक्षाबंधनाचा चार अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहेत. या शुभयोगावरती आपण आपल्या भावास राखी बांधा याचा लाभ दोघांनाही नक्की प्राप्त होईल.

यातील पहिला योग आहे आयुष्यमान योग. कि जो सूर्योदयापासून दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी पर्यंत आहे. रवी योग हा पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होत असून त्याची समाप्ती सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी होत आहे. तर सौभाग्ययोग दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी पर्यंत असेल.

यासोबतच धनिष्ठा नक्षत्र सोबत शुभ योग सुद्धा निर्माण झालेला आहे. तर या चार सोबर्स योगावर आपण आपल्या भावास राखी बांधू शकता. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ नक्की कधी आहे. मित्रांनो ११ ऑगस्ट गुरुवारी सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी ०६:१८ या एका तासाच्या कालावधीत भद्रा पुछ असणार आहे.

तर त्यानंतर लगोलग म्हणजेच सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत भद्रा मुख असणार आहे. आणि या भद्रा काळाची समाप्ती रात्री ०८:५१ मिनिटांनी होत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की, सायंकाळी ०५ वाजून १७ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत या पावणे तीन तासांच्या कालावधीत आपण चुकूनही आपल्या भावास राखी बांधू नका.

रात्री ०८:५१ पासून पुढे भद्रा समाप्तीचा कालावधी आहे. यामध्ये आपण राखी बांधू शकता कारण भद्राचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होईल. लक्षात ठेवायची गोष्ट इतकीच आहे. सायंकाळी ०५:१५ वाजेपासून ते रात्री ८:०० वाजेपर्यंत भद्राचा जो प्रभाव असेल तो प्रचंड असणार आहे. आणि म्हणून या काळात चुकूनही राखी बांधू नका.

जर काही कारणास्तव तुम्हाला राखी बांधणे गरजेचे आहे तर अशावेळी प्रदोष काळामध्ये म्हणजेच सायंकाळी ६:०० वाजेपासून ते रात्री ०७:३१ पर्यंत या कालावधीत या प्रदोष काळामध्ये आपण राखी बांधू शकता. जर खरोखर खूप मोठी अडचण असेल तर त्यावेळी बांधू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *