नमस्कार मित्रांनो.
धनु ही राशिचक्रातील नववी रास आहे. या राशीचा बोधचिन्ह पुरुष ज्याच अर्ध शरीर पुढच्या भागाच पुरुषाच आणि मागच्या भागात घोड्याच आहेत. पुरुषाने हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आपल्या लक्ष्यावर तो बाण रोखलेला आहे. परंतु तो बाण सोडलेला नाही. याचा अर्थ असा की मानवी बुद्धी अचाट असून घोडा म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची अमर्याद ताकद या राशीमध्ये आहे.
बुद्धी आणि ताकद यांचा अनोखा संगम धनु राशि मध्ये झालेला पाहायला मिळतो. चला आता बघूया धनु राशि साठी कसा असणार आहे ऑगस्ट महिना. या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सर्वांचे नाते एकमेकांप्रती घट्ट होईल. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. आणि तिला घराबाहेर पडू देन टाळा.
भाऊ आणि बहिणीला पूर्ण प्रेम द्या. आणि त्याच वेळी ते तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करतील हे ही लक्षात ठेवा. घरात सर्व काही सामान्य राहील. सुख शांती कायम राहील. अशा वेळी घरातल्या काही गोष्टी घराच्या बाहेर बोलणे टाळा. रोज हनुमान चालीसा पाठ करा. व्यवसायातील खर्च वाढतील ते तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकतात.
अशा परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळा. आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला व्यवसायात तुमच्या मित्राचे योग्य संबंध प्रस्थापित करणं आवश्यक आहे. जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. सरकारी नोकरीत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.
खासगी क्षेत्रात काम करणारी लोकं स्वतःसाठी नवीन क्षेत्राच्या शोधात असते. अशावेळी तुम्ही स्वतः कडून काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचारही करू शकता. विद्यार्थ्यांना या महिन्यात संमिश्र परिणाम मिळतील. त्यांचं मन अभ्यासात कमी असेल तुम्ही स्वता साठी अस काहीतरी काम कराल ते तुम्हाला नंतर उपयोगी पडेल.
अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक लोक गोंधळात टाकतील. परंतु तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ नका. तुमचं मन एकाग्र ठेवा आणि स्वतःला सुधारण्यासाठी कार्य करत राहा. स्पर्धेत विद्यार्थी या महिन्यात त्यांच्या अभ्यासापासून विचलित होऊ शकतात. ते नवीन क्षेत्राकडे आकर्षित होऊ शकतात.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा. मोठ्यांचा सल्ला घ्या. म्हणजे नंतर तुम्ही अडचणीत येणार नाही.
या महिन्यात लव लाइफ संतुलित असेल अर्थात तुमचा प्रेम जीवन संतुलित असेल. काही प्रसंगी तुमच्या जोडीदाराबाबत तुम्ही निराश होऊ शकता. पण ही निराशा फार काळ टिकणार नाही. तुमचा जोडीदार तुमच्याकडून काही खास अपेक्षा करेल. परंतु तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे नातेसंबंध थोडेसे घट्ट होऊ शकतात.
लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांना या महिन्यात काही लोकांचे आकर्षण वाटू शकते. पण ते लवकरच संपेल. या महिन्यात तुमचे लक्ष खरा जोडीदार शोधण्यात असेल. ज्यांना कोणताही गंभीर आजार किंवा समस्या आहे त्यांची प्रकृती या महिन्यात बिघडू शकते. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात खोकल्याची समस्या असू शकते.
अशा परिस्थितीत जास्त काळजी करण्याऐवजी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला लवकरच आराम मिळेल. त्याचबरोबर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला ही घ्या. मानसिक दृष्ट्या तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता. आणि एखाद्या गोष्टी बद्दल तुमच्या मनात शंका राहील. अशा वेळी शंका उपस्थित करण्याऐवजी उपायावर विचार करा.
ते जास्त फायद्याचे ठरेल. ऑगस्ट महिन्यासाठी धनु राशीचा भाग्यशाली अंक असेल 1आणि शुभारंभ असेल तपकिरी. एक महत्त्वाची टीप खाजगी नोकरी करत असाल तर या महिन्यात असे काही घडेल ज्यामुळे नोकरीत संकट येऊ शकते. अशा परिस्थितीत कोणतेही चुकीचे काम करणे टाळा. आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रामाणिकपणे काम करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.