नमस्कार मित्रांनो.
जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मात दानाच फार मोठ महात्म्य सांगितलेल आहे. आपण जितक दान करतो त्याच्या कित्येक पट आपणास परतून ते मिळत असत. मित्रांनो पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि या श्रावण महिन्यात आपण सुद्धा आपल्या कुवतीप्रमाणे क्षमतेप्रमाणे या पाच वस्तूंपैकी कोणत्याही वस्तूंच दान गोरगरिबांना गरजूंना नक्की करा.
शिवपुराणानुसार या पाच वस्तूंच दान श्रावण महिन्यामध्ये जी व्यक्ती करते, त्या व्यक्तीवर शिवकृपा शिवशंभूंची कृपा नक्की बरसते. मित्रांनो हे दान आपल्या जीवनातील दुर्भाग्य सुद्धा दूर करतात जर तुमच्या जीवनात काहीही चांगल होत नाहीये. जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. जीवन संकटांनी घेरलेल आहे. तर अशावेळी हा दुर्भाग्याचा फेरा नष्ट करण्यासाठी आपण या श्रावण महिन्यात शिवशंभूंना शरण नक्कीच जा आणि या पाच वस्तूंचा दान करण्यास विसरू नका लक्षात ठेवा.
या वस्तूंच दान सूर्यास्तापूर्वी म्हणजेच सूर्य मावळण्यापूर्वी करायच आहे. आणि हे दान सतपात्रे असाव म्हणजेच कोणत्याही अधार्मिक व्यक्तीला हे दान होणार नाही. याचीही काळजी आपण घ्यायची आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिव मंदिराजवळ म्हणजेच भगवान शिव शंकरांच्या महादेवांच्या मंदिराजवळ हे दान जर केलं तर ते अतिउत्तम ठरेल. आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा दिवस हा दान करण्यासाठीचा सर्वश्रेष्ठ वार आहे.
तस तर जर सोमवारी तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर अखंड श्रावण महिन्यात कधीही आपण हे दानधर्म करू शकता. मित्रांनो त्यातील पहिली वस्तू आहे गुळ होय गुळ जर तुमचे तुमच्या कुटुंबीयांसोबत मित्रमंडळींसोबत संबंध खराब झालेले असतील प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही जे काही बोलता समोरची व्यक्ती उलटा अर्थ काढते आणि त्या व्यक्तीचे तुमच्याशी संबंध खराब झालेले असतील तर हे संबंध पूर्ववत होण्यासाठी संबंधांमध्ये मधुरता निर्माण होण्यासाठी आपण गुळाच दान नक्की करा.
अनेक लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की गुळाचे दान केल्याने संबंध कसे सुधारतील लक्षात ठेवा जर पती-पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा नक्कीच खराब आहे. किंवा गुरु हा अशुभस्थितीमध्ये आहे. ज्यावेळी आपल्या कुंडलीतील चंद्र खराब शेतीत असतो. तेव्हा आपले आपल्या आईबरोबरचे नाते बिघडते.
आईबरोबर म्हणजे मुल आणि आई यांच्यातील संबंध खराब होतात जेव्हा मंगळ खराब असतील तेव्हा भावंडांसोबत भांडणे होतात. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवा गुरु जर अशुभस्थितीत असेल तर पती-पत्नीच नव्हे तर संतानसंबंधी सुद्धा समस्या उद्भवतात. तर लक्षात ठेवा संबंध कोणतेही असो ते जर मधुर बनवायचे असतील तर आपण गुळाचे दान नक्की करा.
दुसरी वस्तू काळे तीळ होय मित्रांनो काळे तीळ जर आपण महादेवांना अर्पण केले शिवलिंगावर पण अर्पण केले तर त्याने सुद्धा दुर्भाग्य दूर होतं तसेच आपण गोरगरिबांना सुद्धा या काळ्या तिळाचे दान नक्की करा. दुभाग्याचा फेरा नष्ट होईल. तिसरी वस्तू आहे धान्य म्हणजे कोणत्याही प्रकारच अन्नाचं दान अन्नदान मित्रांनो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. ज्या दानातून एखाद्याची भूक क्षमते.
एखाद्या भुकेलेल्या एखादी जी भुकेलेली व्यक्ती आहे ती जेव्हा तुम्ही केलेल्या दानधर्मातून समाधानी बनते तिच्या पोटाची भूक क्षमते तेव्हा तिने दिलेले आशीर्वाद आपल्या जीवनातून दुर्भाग्य संपुष्टात आणतात. शिवपुराण तर असेही मानत की अन्नधान्याच दान केल्याने आपल्या घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही. या ठिकाणी अन्नधान्य याचा अर्थ संपन्नता होय, समृद्धी होय, चौथा दान म्हणजे मिठाच दान मित्रांनो मीठ हे घराच्या बरकतिशी संबंधित आहे.
होय आणि म्हणून जर खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या जीवनात अडचणी आहेत दुभाग्य आहे. तर हे दुर्भाग्य दूर करण्यासाठी आपण मिठाचे दान आवर्जून करा ज्यांना समोर अंधारात अंधार दिसतो आहे जीवनामध्ये रस्ता सापडत नाहीये. अनेक जण आम्हाला सांगतात की अमुक अमुक चूक घडली आहे आणि काय कराव समजत नाही.
त्यांच्याकरता सांगतो जर तुमच्या समोरचे सगळे पर्याय बंद झालेले आहेत. सगळे रस्ते बंद पडलेले आहेत. तर आपण मिठाचे दान आवश्यक करून पहा शिवशंभू भोळे आहेत तुमचे हे छोटसं दान की जे तुम्ही शिवशंभूंना सांगून करता. शिवशंभु तुमची प्रार्थना नक्की ऐकतील आणि मित्रांनो पाचव आणि शेवटचे दान जे आहे.
मित्रांनो पाचवी आणि अंतिम वस्तूची आपण या श्रावण महिन्यामध्ये नक्की दान करावी. ती म्हणजे तूप पण तुपाच दान नक्की करा. विशेष करून ज्यांच्या घरात एखादी व्यक्ती दीर्घ काळापासून आजारी आहे. आजारपण हटत नाहीये. एखाद्या मोठ्या रोगाने जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती त्रस्त आहे.
तर हे आजारपण हा रोग दूर करण्यासाठी किंवा घरावर आलेले संकट दूर करण्यासाठी आपण या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगा वरती थोड तूप नक्की अर्पण करा आणि महादेवांकडे प्रार्थना करा हे संकट दूर करण्याची, हा रोग आणि हे आजारपण दूर करण्याची आणि सोबतच गोरगरिबांना तुपाचे दान करा. यामुळे मित्रांनो आजारपण संपेल, रो-ग संपतील आणि दीर्घायुष्याची प्राप्ती सुद्धा होईल. तर मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये या पाच वस्तूंचे दान आपण नक्की करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.