मकर राशीचे हे गुण बनवतात त्यांना यशस्वी. असतो यांचा स्वभाव असा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि महाराजांना न्यायाधीश म्हटल जात. आणि मकर राशीचे स्वामी आहेत शनि महाराज. शनि महाराजांकडूनच मकर राशीच्या लोकांना मेहनती स्वभाव आणि प्रामाणिकपणा मिळतो. या राशीची लोक सहसा उंच पाहायला मिळतात. या लोकांना महत्त्वकांक्षा देखील भरपूर असतात. आणि ते यशस्वी होण्यासाठी मेहनतही करतात.

ही लोक शिस्तप्रिय सुद्धा असतात. निर्भय असतात चांगले व्यवस्थापक होऊ शकतात. ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ही लोक भरपूर परिश्रम करतात. त्याचबरोबर वक्तशीर सुद्धा ही लोक असतात. जबाबदार व्यक्तींमध्ये मकर राशीच्या लोकांचा समावेश होतो. त्यांना त्यांची जबाबदारी चांगली समजते.

मग ते काम असो किंवा कुटुंब यांचा स्वभाव बलवान आणि ज्वलंत असतो. त्यांना बंधनात राहण आवडत नाही. त्यांना त्यात गुदमरल्यासारखं वाटत. त्यांना कोणत्याही गोष्टीने दडपल जाण आवडत नाही. त्यांना स्वतःबद्दल असा समज असतो की त्यांना बरच काही माहिती आहे. तर्कहीन गोष्टी ते स्वीकारत नाहीत.

त्यांना शिस्तीत राहायला आवडत त्यामुळे त्याचा त्रास इतरांना कधी कधी होतो. परंतु ते अतिशय विनम्र आणि खुल्या मनाचे असतात. तसेच सहनशील सुद्धा असतात. चटकन राग येत नसला तरी राग आल्यावर शांत व्हायला बराच वेळ लागतो. मकर राशीची लोकं कामासाठी समर्पित असतात. प्रत्येक काम वेळेवर जबाबदारीने पूर्ण करतात.

ते एकाच वेळी अनेक कामे करण्यास सक्षम असतात. स्मरणशक्ती सुद्धा चांगली असते. त्यांच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम ते करतात. अजिबात शॉर्टकट घेत नाहीत. कुठल्याही कार्यालयामध्ये जर मकर राशीचा व्यक्ती असेल तर तो मेहनती कर्मचारी म्हणूनच ओळखला जातो. ते कोणतही काम हातात घेण्यापूर्वी भूत भविष्य आणि वर्तमानाचा विचार करतात.

मकर राशीची लोक त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असतात. ते पटकन कोणत्याही बंधनात अडकला पसंत करत नाहीत. पण ते जेव्हा एखाद्या शी जोडले जातात तेव्हा त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण हे त्यांच कर्तव्य मानतात. त्यांच्या कृतीतून इतरांना वाईट वाटणार नाही याची काळजी घेतात.

ते शब्दांपेक्षा कृतीतून भावना व्यक्त करतात. त्यांना निसर्गाची खूप आवड आहे आणि त्यांना त्याच बरोबर निसर्गाच्या कुशीत राहिला आवडत. संगीत आणि कलिकडे सुद्धा त्यांचा नैसर्गिक कल आहे. मितभाषी, गंभीर, उच्च पदावरील व्यक्ती त्यांना आवडतात. देव आणि नशिबावर या व्यक्तींचा विश्वास असतो. पसंती आणि ना पसंती याबद्दल त्यांची मतही दृढ असतात.

त्यामुळे त्यांच्या जीवनसाथीला जोडीदाराला काही गोष्टी त्रासदायक वाटू शकतात. या राशीची लोक मित्रांच्या सहकार्याने जीवनात प्रगती करतात. या राशीच्या मुली सडपातळ असतात. त्यांना व्यायाम करायला आवडत‌. आमची जास्त असूनही यांना हाय हिल सॅंडल घालायला आवडत.

पारंपारिक प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये विचार मांडतात. या राशीच्या मुलींना पिळदार शरीराचे पुरुष जास्त आकर्षित करतात. करिअर क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट घेतात.

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही जोखीम स्वीकारायला सुद्धा या राशीची लोक तयार असतात. मग मंडळी तुमची रास मकर आहे का. तुमच्या घरात कोणाची रास मकर आहे का. आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे. अगदी असाच असेल किंवा अगदी वेगळा असेल तरी तो नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *