छोटीशी वेलची आणि त्यावर कोमट पाणी करते इतके मोठे आजार दूर, लाखो रुपयांची औषधे देखील करणार नाहीत..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो घरातील साधे साधे उपाय देखील खूप कामी येतात, आजार लहान असतात तोवरच त्यावर उपाय करणं चांगलं असत. आपण जर आजारावर उपचार करायला वेळ केला तर ते आजार आपणाला लाखो रुपये खर्च करायला भाग पाडतात, मित्रहो आज आपण लेखातून असा एक उपाय जाणून घेणार आहोत.

ज्यामुळे खूप मोठे मोठे आजार दूर होतात व आपले पैसे वाचतात. मित्रहो जेवणासाठी आपण खुपसा मसाला वापरतो, यामधील हे मसाले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मसाल्यात वेलची आपण सर्वजण वापरतोच, ही वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून देखील वापरली जाते. वेलची दोन प्रकारची असते, एक छोटी वेलची असते आणि एक मोठी वेलची असते.

मोठ्या वेलचीचा वापर मसाल्यात केला जातो, चहा बनवताना, शिरा बनवताना किंवा लाडू बनवताना,पुरणाची पोळी बनवताना लहान वेलचीचा वापर होतो. लहान वेलची म्हणजेच हिरवी वेलची ही सर्वानाच आवडते, गोड पदार्थाना अधिक रुचकर बनवण्यात हिचा मोलाचा वाटा असतो.

अशी ही वेलची एक ग्लास कोमट पाण्यासोबत वापरली तर याचे फायदे अतिशय छान होतात, अगदी चमत्कार झाल्यासारखे वाटतात. या वेलची मध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, बी, सी तिन्ही प्रकार असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन इ हे मोठ्या प्रमाणावर असते जे शरीरासाठी उपयुक्त असून शरीरातील हार्मोन्स वाढवते, वेलची शरीरातील रक्त देखील शुद्ध करते.

एखाद्या व्यक्तीच्या रक्तात कोलेस्टेरॉल वाढले असेल, रक्त अशुद्ध झाले असेल तर वेलचीचा वापर नक्की करावा. मित्रहो आजचा हा उपाय अतिशय सोपा आहे, यामध्ये फक्त रोज सकाळी एक वेलची खायची आहे व वेलची खाऊन झाल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे. हा उपाय सकाळी उपाशी पोटी करायची आहे.

बऱ्याच व्यक्तींना आपली बुद्धी तल्लख असावी असे वाटते, काहींना आपली स्मरणशक्ती उत्तम असावी असे वाटते. अशा व्यक्तींनी या वेलचीचा वापर अवश्य करावा, ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे अशा व्यक्तींनी जर याचा वापर केलेला तर त्यांना नक्कीच फायदा होतो. यासाठी एक वेलची, दोन बदाम एकत्र वाटून घ्यायचे आहे.

हे सकाळी उपाशी पोटी खायचे आहे. हे खाऊन झाल्यावर एक ग्लास दूध प्यावे. हा उपाय केल्यास अवघ्या चार ते आठ दिवसात फरक जाणवायला लागेल. ज्या व्यक्तींच्या तोंडाचा वास नेहमी येतो, खाल्लेले अन्न पचत नाही, करपे ढेकर येतात, अपचन होते, गॅसेस होतात, खाल्लेले अन्न न पचल्याने पोट ताणले जाते. या सर्व समस्यांना दूर करायचे असेल तर हा उपाय करा.

एक वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी पिल्यास निश्चितच या सर्व समस्या दूर होतात. साधारण इंचभर आल्याचा तुकडा, दोन वेलची, दोन लवंगा आणि एक चमचा धने पावडर एकत्र करून वाटून घ्या आणि हे मिश्रण रोज संध्याकाळी एक चमचा जेवणानंतर घ्या व त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या.

त्यामुळे तुमच्या छातीतील साचलेला कफ एकदम साफ होईल, सर्दी खोकला कमी होतो. सोबतच पोटावर वाढलेली चरबी कमी होते. ही वेलची दिवसातून ३ वेळा चावून खाल्ल्याने बीपी प्रमाणात राहते, त्यामुळे शरीरातील ताकद वाढते व वांझपणा कमी होण्यास मदत होते. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *