नमस्कार मित्रांनो.
मिथुन रास ही राशीचक्रातील तिसरी रास असून बुध ग्रह हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. जो अतिशय बुद्धिमान ग्रह मानला जातो. आणि बुधाची ही बुद्धिमत्ता मिथुन राशीला ही मिळते अस म्हणतात. पण मिथुन राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे चला जाणून घेऊया.
ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे आणि तुमच्या आईच्या विचारात मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे घरात तणावाच वातावरण निर्माण होईल. या काळात तुमच्या आईची तब्येत थोडी खराब होऊ शकते. ज्यामुळे मन विचलित होईल. थोडा धीर धरा सगळ ठीक होईल. घरात सुख शांती प्रस्थापित करण्यासाठी रोज हनुमान चालीसा चा पाठ करा.
त्यामुळे कुटुंबावर येणारी संकट दूर होतील. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी लागू शकते. त्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि मतभेद दूर व्हायला घरातील ही घटना नक्कीच मदत करेल. या महिन्यात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम मात्र करावे लागतील.
तुम्हाला भाऊ किंवा बहिणीच सहकार्य सुद्धा मिळू शकत जे तुम्हाला मदत करेल. या काळात तुम्हाला थकवा देखील येऊ शकतो. त्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. सरकारी अधिकाऱ्यांना या महिन्यात स्वतःसाठी नवीन क्षेत्र निवडावे लागतील. ज्यामुळे त्यांचा अनुभव वाढेल. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांच मन सुद्धा नवीन गोष्टींकडे आकर्षित होईल.
त्यामुळे त्यांच मन त्यांच्या सध्याच्या कामात रमणार नाही. तुम्ही तुमच्या कामाबाबत थोडीशी चिडचिड या महिन्यात करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. त्यांच्या पालकांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील. त्यांना काही क्षेत्रात अपयशाचा सामना करावा लागेल. परंतु आत्मविश्वास मात्र पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
अशावेळी कोणत्याही समस्येला धैर्याने सामोरे जा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना या महिन्यात यश मिळू शकत. ज्यामुळे त्यांच मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार काम करत रहा. या महिन्यात तुमच्या मनात निराशेची भावना असेल ज्यामुळे तुमच्या जोडीदाराशी तुमचा तेढ निर्माण होऊ शकतो.
तुमच्या निराश स्वभावामुळे तुमच्या साथीदार ही तुमच्यावर निराश होऊ शकतो. बाकी इतर बाबतीत विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराचा पाठिंबा मात्र मिळेल पण तुम्ही जास्त त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. लग्न न झालेल्या लोकांच मन थोड उदास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच मन कशातही लागणार नाही. या महिन्यात स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
ज्यांना श्वासाचा त्रास आहे त्यांनी या महिन्यात स्वतःची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही धर्माचे रुग्ण असाल तर लक्षात ठेवा की हा महिना तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच इन्हेलर सोबत असू द्या. जेणेकरून कुठलीही मोठी समस्या उद्भवणार नाही.
तसे तर या महिन्यात कुठलाही शारीरिक दृष्ट्या गंभीर त्रास होणार नाही. परंतु मानसिक दृष्ट्या मात्र तुम्ही अस्वस्थ असू शकता. एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावेल. ज्यामुळे तुमच मन अस्वस्थ राहू शकत. ऑगस्ट महिन्यासाठी मिथुन राशीचा भाग्यशाली अंक आहे.
६ त्यामुळे या महिन्यात ६ अंकाला प्राधान्य द्या आणि शुभ रंग असेल पांढरा त्यामुळे या महिन्यात पांढऱ्या रंगाला ही प्राधान्य द्या. मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी योगासन प्राणायाम या गोष्टींना प्राधान्य द्या. जवळच्या व्यक्तींजवळ मनमोकळे करा. त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.