पेढे वाटायला रहा तयार श्रावण या राशींसाठी असेल आनंदी. घेऊन आला आहे वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २०२२ चा श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू झाला आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर महादेवांची कृपा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना महादेवाच्या पूजेसाठी व्रतवैकल्ल्यासाठी ओळखला जातो. महादेवांचा सगळ्यात प्रिय महिना श्रावण आहे.

याच श्रावण महिन्यामध्ये काही राशींवर महादेवांची कृपा होणार आहे. मग त्या राशींच्या जीवनात काय बदल होणार आहेत.आणि कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया. मित्रांनो श्रावण महिना लागल्यानंतर बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दुधाचा सिंह प्रवेश महत्त्वाचा मानला जातो आहे.

कारण बुध ग्रह हा व्यापाऱ्यांचा रक्षक आहे. त्याचबरोबर बुध ग्रह हा सत्याचा कारक ग्रह आहे. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. आणि तो सर्वात प्रभावशाली मानला जातो. आणि बुधाचा हा सिंह प्रवेश काही राशींना फायदा देतो आहे. त्यामध्ये सर्वात पहिली रास आहे मेष रास.

मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना सकारात्मक असा हा काळ ठरणार आहे.या कालावधीमध्ये त्यांच्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला मुलांकडून सुद्धा चांगली बातमी कळू शकते. हे ऐकून तुमचे मन प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यश मिळेल.

त्याचबरोबर यश मिळवण्यासाठी तुम्ही जे कठोर परिश्रम घेत आहात. त्या तुमच्या परिश्रमाच आणि गुणांच कौतुक सुद्धा होईल. या काळात तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तसेच गैरसमज सुद्धा दूर होऊ शकतात. आणि समजदारपणा सुद्धा वाढू शकेल. एकूणच तुमचा श्रावण जोरदार असणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

सिंह रास- या राशी मध्ये होत असलेल्या बुधाचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांना सुधा लाभदायक ठरू शकतो. आगामी काळ हा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरू शकेल. तुमच संवाद कौशल्य सुधारेल. तुम्ही लोकांचे मन वळवू शकाल. जर तुम्ही नवीन योजनेवर काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे.

तुम्हाला व्यवसायात चांगला नफाही मिळेल. परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. म्हणजेच सिंह राशीच्या लोकांचा श्रावण सुद्धा बहारदार असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आहे बुधाच स्वामित्व असणारी कन्या रास.

कन्या रास- या कन्या राशीसाठी सुद्धा बुधाच सिंह राशीतील प्रवेश लाभदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत चांगलीच वाढ होणार आहे. कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले होऊ शकतात. तुमच्या मुलांसोबतही तुम्ही चांगला वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चढउतारांना सामोरे जावे लागेल.

पण नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मात्र चांगली बातमी मिळू शकते. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या श्रावण महिन्यात नक्कीच चांगला नफा होणार आहे. गुरुचे स्वामीत्व असलेली धनु रास.

धनु रास- या धनु राशीच्या लोकांना सुद्धा श्रावण महिना नक्कीच हसरा आणि चांगला जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक सुखकारक गोष्टी घडून येतात. जोडीदाराशी यांचे नातेसंबंध सुधारतील. दुसरीकडे जे लोक अद्याप अविवाहित आहेत.

त्यांच्यासाठी चांगली स्थळ सुद्धा येऊ शकतात. तुमचं ध्येय तुम्ही यशस्वीरित्या साध्य करू शकाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जे अडथळे तुम्हाला येत आहेत ते सुद्धा कमी होतील. आणि तुमची अडचणीतून सुटका होईल. आता वळूया शनीच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीकडे.

कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा श्रावण महिना खास असणार आहे. इंद्रधनुष्यांच्या रंगांप्रमाणेच अनेक रंग यांच्या आयुष्यात या महिन्यामध्ये दिसून येतील. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमच्या पालकांच्या पाठिंब्याने तुमचा समाजात मानसन्मान ही वाढेल.

तुम्ही राहिलेली अनेक कामे पूर्ण करू शकाल. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांचा श्रावण हसरा नाचरा जाणार आहे अस म्हणायला हरकत नाही. मग यामध्ये तुमची रास आहे का आम्हाला सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *