मेष रास- ऑगस्ट महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

२०२२ साला मधला ऑगस्ट महिना सुरू होताच सर्वजण त्यांच्या राशीनुसार मासिक राशिभविष्य बघायला सुरुवात करतात. कारण २०२२ मधला ऑगस्ट महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. चला तर मग जाणून घेऊया २०२२ मधला ऑगस्ट महिना मेष राशीसाठी कसा असणार आहे. नक्की कोणते बदल त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत किंवा कोणती आव्हानं त्यांची वाट पाहत आहेत.

ऑगस्ट महिन्यामध्ये मेष राशीच्या कुटुंबावर शनीचा अधिक प्रभाव राहील. जर तुम्ही एखाद्या कडून पैसे घेतले असतील तर तो या महिन्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतो. कुटुंबात मालमत्तेबाबत ही वाद होऊ शकतात. घरातील सदस्यांमध्ये कटूता निर्माण होऊ शकते.

परस्पर बंधू भावही कमी होईल. त्यामुळे थोडे धिरान घ्या. काळ सगळंच ठीक करेल. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करा. याशिवाय घरात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. ज्यामुळे महिन्याच्या शेवटी सर्व काही सामान्य होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना शुभ राहील.

तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रात असाल तर अनेक मोठे करार कराल. पण कुठलेही करार करताना व्यवस्थित तपासून घ्या. सावध राहा. या काळात तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. पण तुमच्या सतर्कतेमुळे असं काहीही होणार नाही. त्यामुळे सतर्क रहा.

सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचे सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल. खाजगी क्षेत्रात काम करणारी लोक तुमच्या कामावर पूर्ण लक्ष देतील. ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगले परिणाम मिळतील. तुमचे बॉस आणि वरिष्ठ इतर सहकारी तुमच्या कामावर खुश असतील.

जर तुम्ही शाळेत असाल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या वर्ग मित्रांकडून थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतर गोष्टीतील लक्ष कमी करून तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. कोणाशीही वाद घालणार, नको त्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवन या महिन्यात टाळा.

जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यात तुम्ही तुमच्या तयारीबद्दल असमाधानी असू शकता आणि त्यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. तुमच्या मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. तो तुम्हाला उपयोगी पडेल. विवाहित लोकांचा त्यांच्या जोडीदारावर अधिक विश्वास बसेल. सासरच्या मंडळीकडून ही त्यांना चांगली बातमी मिळू शकते.

अशावेळी सर्वांशी चांगल वर्तन मात्र ठेवा जे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. लव लाईफ म्हणजे प्रेम जीवनाबद्दल बोलायच झाल तर प्रेम मुलांसाठी हा महिना नक्कीच चांगला असेल. जर तुम्ही विवाहित नसाल अर्थात लग्नासाठी स्थळ बघत असाल तर एखादे चांगले स्थळ नक्कीच तुमच्यासमोर येऊ शकते.

परंतु स्वतःच्या दुर्गुणांवर थोडा विजय मिळवा नक्कीच सगळ चांगल होईल. सर्दीची समस्या या महिन्यात तुम्हाला जाणवू शकते. या महिन्यात सर्दी खोकला ताप या गोष्टींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आहाराची काळजी घ्या. थंड वस्तूंच सेवन करू नका. आणि पावसामध्ये बाहेर फिरू नका. मधुमेहाच्या रुग्णांनी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मिठाईच अजिबात सेवन करू नये.

अन्यथा प्रकृती बिघडू शकते. मानसिक दृष्ट्या तुम्हाला काही चिंता असू शकतात. ज्याचे निराकरण लवकरच होईल. तुमच्या मनाची जी काही मानसिक घालमेल होत असेल किंवा कुठली समस्या तुम्हाला सतावत असेल तर जवळच्या व्यक्तींकडे त्याबद्दल नक्कीच बोला. मन मोकळं करा त्याचा तुम्हाला मानसिक दृष्ट्या फायदा होईल.

मेष राशीचा ऑगस्ट महिन्यासाठी भाग्यशाली अंक आहे ७. सात आकड्याला या महिन्यात प्राधान्य द्या. आणि शुभ रंग असेल केशरी त्यामुळे रंगालाही प्राधान्य तुम्ही देऊ शकता. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज योगासन करा प्राणायाम करा व्यायाम करा. ओंकार कपालभारती सारखे प्राणायम तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *