दिप अमावस्येला पितरांसाठी असा ठेवा दिवा. घरातील कटकटी दूर होतील, लक्ष्मी घरात येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

यंदा २८ जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. तिलाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस अस म्हणतात. या दिवशी देवघरातले दिवे स्वच्छ उजळून संध्याकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून त्यांची यथासांग पूजा केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य ही दाखवला जातो. तस करण या परंपरेचा एक भाग आहे.

परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीप पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी, यामागचे शास्त्र काय आहे चला जाणून घेऊया. अमावस्येच्या तिथीला पितरांच स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तसंच दानधर्मही केला जातो. प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्त्व आहे.

त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते. अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. हा दिवा दीप पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्हीही हेतू साध्य करतो.

दीपा मावशी निमित्त या दिवशी दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यम सदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच क्रीडा मुंगीच्या रूपाने दिव्या पाशी गोळा होणारे जीव ते पण खाऊन तृप्त होतात. हे अप्रत्यक्ष अन्नदानाच पुण्य आहे.

हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानावर वाढला जातो. मनुष्याला सणवार एक वेळा लक्षात राहणार नाहीत परंतु पोटात गेलेला पदार्थ ते सहसा विसरत नाहीत. कणकेची दिवे या सणाची ओळख म्हणून प्रतिवर्षी या सणाची आठवण करून देत राहतात.

सर्वसामान्य घरातील लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. एवढ्यात तो बनवणे सोप आहे. आणि बिना खर्चिक आहे. या कणकेच्या दिव्यांमध्ये साजूक तूप घालून खाल्लं की तो आणखीन चविष्ट लागतो. हे दिवे आपल्याला एवढे आवडतात की खाऊन ते आपले पितर अनेक सूक्ष्मजीव आणि जिवाणू सुद्धा तृप्त होतात.

यासाठीच दिप अमावस्येला दिव्यांचा प्रकाशन केल जात. तुम्ही सुद्धा हे दिवे बनवण्यात उत्सुक आहात. तर त्याची कृती सांगते. पाव वाटी गुळ बुडेल एवढे पाणी गुळ पूर्ण विरघळवून घ्यावा. एक वाटी कनीक अर्थातच गव्हाचे पीठ घेऊन चिमूटभर मीठ आणि दोन चमचे तूप घालून कणिक चांगली एकत्र भिजवून घ्यावी.

गुळाचे पाणी हळूहळू घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी. आपण पुऱ्यांसाठी करतो तेवढे गोळे बनवावेत आणि दिवा पणतिचा आकार त्या गोळ्याला द्यावा. एका चाळणीत तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात हे दिवे ठेवावेत. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावं आणि त्यावर ही चाळणी अलगद ठेवावी.

वरती ताट झाकण लावून लावून ठेवावे. हे दिवे इडलीपात्रातही करता येतात. किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. तेव्हा शिट्टी मात्र काढून टाकायची. जवळपास २0 मिनिट हे दिवे शिजू द्यावेत आणि मग गॅस बंद करून दिवे थोडे गार झाल्यावर साजूक तूप घालाव.

आता हे दिवे जेव्हा तुम्ही दिव्यांची पूजा करता तेव्हा त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी तर ओवाळाच पण त्याचबरोबर या दिव्यांनी तुम्ही घरातील छोट्या मुलांनाही ओवाळू शकता आणि यातलाच एक दिवा तुम्ही पितरांसाठी दक्षिण दिशेला नेऊन ठेवू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *