या राशीच्या लोकांनी सल्ल्याशिवाय रत्न धारण करू नये. नाहीतर आयुष्यभर,

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुम्ही अनेकांना रत्न परिधान करताना पाहिले असेल. बरेच लोक सल्ल्यानुसार रत्न धारण करतात. पण काहीजण सल्ला न घेताच रत्न धारण करतात. रत्न परिधान करण्याबाबत अनेक तज्ञ म्हणतात की सल्याशिवाय रत्न घालू नयेत. तज्ञांच्या मते जर तुम्ही तुमच्या राशीनुसार रत्न परिधान केले तर तुम्हाला नक्कीच खूप लाभ होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या राशीच्या लोकांनी कोणती रत्न अजिबात घालू नयेतृ. वृषभ रास या राशीच्या लोकांनी विशेषतः कोरल आणि पुष्कराज ही रत्न घालू नयेत.

१) वृषभ राशी- वृषभ राशीच्या लोकांसाठी ही रत्न तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण करतात. जर तुम्ही ही रत्न धारण केले तर तुमच्या आयुष्यात कधीही शांतता येणार नाही. २) मेष रास- मेष राशीच्या लोकांनी पन्ना आणि पुष्कराज घालू नये. ही रत्न या लोकांच्या आयुष्यात फक्त हानी पोहोचवतात. एवढेच नाही तर त्यांचे कुटुंबीय ही त्यांच्यावर नाराज राहतात.

३) सिंह रास- सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा शनि देवांचं नीलम हेरत्न कधीही धारण करू नये. कारण सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. त्यामुळे हे रत्न त्यांना अजिबात लाभत नाही.
४) कर्क राशी- कर्क राशीचा सुद्धा असंच आहे कर्क राशीच्या लोकांनी सुद्धा नीलम हेरत्न कधीही धारण करू नये. कारण ते शनि देवांचे रत्न आहे. आणि कर्क राशीचा स्वामी सुद्धा चंद्र आहे. कर्क राशीच्या लोकांना हे रत्न अजिबात लाभत नाही.

५) मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी हीरा आणि नीलम ही रत्न घालू नयेत. त्यांच्यासाठी ती अशुभ ठरतात. ६) कन्या राशीच्या लोकांनी नीलम मानिक कोरल ही रत्न घालू नयेत. कारण कन्या राशीचा स्वामी बुध आहे. आणि बुध ग्रहासाठी हे रत्न धारण करण योग्य नाही.

७) मकर राशीच्या लोकांनी पुष्कराज हे रत्न धारण करू नये. मकर राशीच्या लोकांचा स्वामी शनी आहे. आणि पुष्कराज हे गुरुच रत्न आहे त्यामुळे ते त्यांना लाभत नाही. मंडळी इतकच नाही तर ८) कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी देखील शनी आहे. आणि त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा पाचू हे रत्न धारण करू नये.

९) वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी कोरल आणि हिऱ्याची रत्न घालू नयेत. १०) तूळ राशीच्या लोकांनी पाचू आणि पुष्कराज घालू नये. ११) तर धनु राशीच्या लोकांनी मोती घालण हानिकारक आहे. १२) मीन राशीच्या लोकांनी नीलम आणि माणिक ही रत्न धारण करू नयेत. त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरू शकत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *