या आहेत शनिदेवांच्या प्रिय राशी‌. ज्यांना साडेसाथी असतानाही होतो कमी त्रास.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार शनि देवांच्या प्रिय राशींना साडेसातीचा सामना करताना इतर असेना होतो तितका त्रास होत नाही अस म्हटल जात. मग कोणत्या आहेत या शनि देवांच्या प्रिय राशी चला जाणून घेऊया. मंडळी शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय आपल्याकडून केले जातात.

शनिवारी शनि देवांना मोहरीचे तेल काळे तीळ अर्पण करावे तर त्यांची पूजा करावी आणि व्रत कराव. जेणेकरून शनिदेवांचा प्रकोप टाळता येतो. शनिदेव व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात. म्हणून त्यांना कर्मफळ दाता म्हटल जात. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि बलवान असतो.

त्यांना आयुष्यात कोणती समस्या येत नाही. कमकुवत शनि व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आर्थिक दृष्ट्या सुद्धा कमकुवत करतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या प्रिय राशीना शनि च्या साडी साठी चा सामना करताना इतर इतर राशीन पेक्षा कमी त्रास होतो अस म्हणतात. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे.

तुळ रास- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा असते. ही शनि देवांची उच्च रास मानली जाते. शनि देवांच्या आवडत्या राशींपैकी ही एक रास आहे. हे लोक खूप मेहनती असतात. ते कोणाचीही चुकीची गोष्ट खपवून घेत नाहीत. त्यांना सत्तेच्या बाजूने उभ राहण आवडत. तूळ राशीच्या लोकांवर शनीची दशा इतर राशींच्या तुलनेत कमी प्रभाव पडते.

मकर रास- या राशीचा अधिपती ग्रह शनी आहे. त्यामुळे ही रास शनीच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. हे लोक खूप बुद्धिमान मानले जातात. एवढेच नाही तर मेहनतीच्या जोरावर ते पटकन यश मिळवतात. ते मेहनती आहेत आणि सहजासहजी हार मानणार नाहीत. त्यांच्यावर शनि देवांचा वाईट प्रभाव लवकर पडत नाही असं म्हटल जात.

कुंभ रास- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामीग्रह शनी आहे. हे लोक स्वभावाने साधे सहनशील असतात. एखादे काम करायचं म्हटल्यानंतर ते काम पूर्ण करूनच दाखवतात. या लोकांची आर्थिक स्थिती ही चांगली असते. हे लोक लवकर हार मानत नाहीत हे यांच वैशिष्ट्य आहे.

मंडळी शनि देवांना प्रसन्न करायच असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई-वडिलांचा अपमान कधीही करू नका. आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांवर शनि देव कधीही प्रसन्न होत नाहीत. त्याचबरोबर गोरगरिबांना दानधर्म करा. गरजू व्यक्तींच्या गरजा समजून घ्या.

कारण मी सुरुवातीला म्हटल तस शनिदेव हे कर्मफळ दाता आहेत. जस कर्म कराल तसंच फळ ते तुम्हाला देतील. मग जर तुम्ही चांगल काम केल तर त्याच फळ निश्चितच चांगल असेल. आणि वाईट कर्माचा फोन नक्की शनिमहाराज वाईटच देतील. म्हणूनच सतत चांगल कर्म करत राहाव.

म्हणजे आपल्या कर्माच फळ आपल्याला नेहमीच चांगल मिळत. आणि सुख समृद्धी आपल्या आयुष्यात येते. मंडळी शनि देवांच्या या प्रिय राशींमध्ये तुमची रास आहे का आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *