मोत्यांची अंगठी या राशींसाठी आहे नुकसान दायक. जाणून घ्या नाहीतर, आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मोतीची अंगठी घातली आहे का किंवा महिला वर्गाने कानात मोत्याचे कानातले घातले आहेत का? अरे तुम्ही मोती धारण केला आहे का? किंवा मोती धारण करण्याची तुमची इच्छा आहे का. ज्योतिष शास्त्रानुसार समुद्रात सापडलेला मोती चंद्राशी संबंधित आहे.

जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो. चंद्राच्या मजबूत स्थितीमुळे मन शांत राहते. त्याचबरोबर चंद्राचा आपला विचार आणि विचारशक्ती वरही परिणाम होतो. व्यवहारिक दृष्टिकोनातून आपण काय मिळवतो आणि काय गमवतो हे आपल्या विचार योजनांवर अवलंबून असत. जेव्हा आपल मन अस्वस्थ आणि चंचल असत.

तेव्हा अनेक ज्योतिषी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोती घालण्याचा सल्ला देतात. पण मोती खरोखरच तुमच्यासाठी फायदेशीर आहे का. तुमच्या उच्च राशीत मोती योग्य आहे का. जर तुमच्या उच्च राशीनुसार म्हणजेच.

तुमच्या कुंडलीच्या पहिल्या ठाणे मोती धारण करताना नियमांचे पालन केले गेले तर तुम्हाला फायदा होईल. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी मोती घालणं हानिकारक ठरू शकतो.

वृषभ रास- शुक्र स्वामी असलेल्या वृषभ राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये असे करणे त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. वृषभ राशीच्या लोकांनी मोती धारण केले तर त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अचानक अनावश्यक खर्चही वाढतो. आणि त्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांची त्यांचे संबंध बिघडतात.

मिथुन रास- मंडळी मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि त्यांनी सुद्धा मोती रत्न धारण करू नये. असे केल्याने त्यांना जीवनात अनेक चढउतारांना समोर जावं लागतं. मोती रत्न धारण केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही. आणि लग्नाच्या प्रभावामुळे व्यक्ती नव्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. आणि त्यामुळे शांतता आणि आरामही मिळत नाही.

सिंह रास- सिंह राशीसाठी त्यांच्या कुंडलीतील बाराव्या स्थानाचा स्वामी चंद्र आहे सिंह राशीसाठी मोती धारण केल्याने पती-पत्नीच्या नात्यात अडचणी निर्माण होतात. कुंडलीचे बारावी स्थान आर्थिक संबंधित आहे. मोती घातल्याने खर्चही वाढतो आणि बचत करणं कठीण होऊन जातं. अशावेळी भावनिक होऊन तुम्ही आर्थिक नुकसान करून घेऊ शकता.

धनु रास- गुरुचे स्वामित्व असणाऱ्या धनु राशीच्या लोकांनीच म्हणजे ज्यांच्या लग्न राशीत पहिल्या स्थानी क्रमांक लिहिलेला आहे त्यांनी मोती घालू नये. वास्तविकचंद्र हा धनु राशीच्या पाचव्या स्थानाचा स्वामी आहे.

मोती धारण केल्याने त्यांना अचानक नुकसान होण्याची शक्यता असते ‌. त्यांना शेअर्स आणि ट्रेडिंग मध्ये नुकसान होऊ शकत. त्यांना सर्दी खोकला इत्यादी संबंधित समस्या आणि अपघाताची भीती सुद्धा असते.

कुंभ रास- शनि देवांचे स्वामी तू असलेल्या कुंभ राशीच्या लोकांनी मोठी घालू नये. कारण कुंभ राशीतील सहाव्या स्थानी स्वामी चंद्र आहेत. कुंभ राशीचे लोक मोती धारण केल्याने शत्रूंना घाबरतात. त्यांचे बरेच विरोधक सक्रियतपणे त्यांचे नुकसान करतात.

मोत्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अपघात आणि पाण्यासंबंधी धोका वाढतो. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी मोती घालणं टाळाव. मग मंडळी तुम्ही मोत्याची अंगठी घातली असेल तर तुमची रास काय आहे यावर एकदा विचार करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *