फक्त ५ सोमवार करा हे पशुपती व्रत कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पूर्ण वर्षातून महिन्यातून कोणतेही पाच सोमवार निष्ठेने भक्तीने मनोभावाने केले तर भोले बाबा श्रीशंकर देवादीदेव महादेव आपल्या मनातील कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण करतात. मित्रांनो तुमच्या मनात अनेक वर्ष एखाद्या इच्छापूर्तीची आतुरता असेल पण काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर हे पाच सोमवार पशुपती व्रत तुम्ही अवश्य करा.

शिवपुराणात कंदपुराणात पशुपतिव्रताचे अनेक नियम सांगितले गेले आहेत. हे व्रत करणाऱ्या साधकाने काय करावे, कुठले दान करावे याची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजच्या काळात नियम पाळणे शक्य नाही. सोप्या भाषेत शास्त्रात मान्य होईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत हे सुरत आपण बघणार आहोत कसे करावे.

मित्रांनो कोणत्याही महिन्यात सुरुवात करून सलग पाच सोमवार हे व्रत करावे. प्रत करताना काही अडचण आली काही समस्या आली, मासिक धर्म आला तर पुढील सोमवार पकडून हे व्रत पूर्ण करा. प्रत्येक सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे स्नान वगैरे करावे, सूर्याला अर्घ्य द्यावे.

सूर्याला अर्घ्य म्हणजे तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन दोन्ही हात वर करून सूर्याला पाणी अर्पण करावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा जप करावा. तुमच्या घराशेजारी असलेल्या शिव मंदिरात जावे. भगवान शिव शंकराची भोले बाबाची शिवलिंगाची प्रार्थना करावी.

जल अर्पण करावे, त्यासाठी पाणी आपल्याच घरातून घ्यावे. मंदिरातील पाणी अजिबात घ्यायचे नाही. श्री शंकराला आवडणाऱ्या सर्व वस्तू घेऊन याव्यात. तर भोले बाबांना बेलपत्र खूप आवडतात. भोले बाबांची पूजा करा. १०८ बेलपत्र शिवलिंगावर पालथी ठेवावी.

१०८ वेळा ओम नमः शिवाय हा जप करावा. महिलांनी नमो शिवाय हा जप करावा. मनोभावाने पूजा अभिषेक जेवढं करता येईल तेवढे कराव. आपली इच्छा शिवलिंगासमोर बोलून दाखवावी. त्या दिवशीच म्हणजे सोमवारी उपवास करावा. फक्त फलहार करावेत फक्त फलहार करावेत. संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा पूजा करावी.

पुन्हा शिव मंदिरात जावे आणि घरून सहा तुपाचे दिवे सोबत घेऊन जावे. साखर किंवा मिठाई न्यावी. शिवलिंगाची पूजा करावी. सकाळी प्रार्थना केली असेल तरीही संध्याकाळी सुद्धा प्रार्थना करावी. तुम्हाला यश समृद्धी वैभव तुमच्या आरोग्यालाही चांगले आहे. म्हणून संध्याकाळी ही प्रार्थना करावी.

मित्रांनो जे आपण सहा दिवे घेऊन जातो. ते कणकीचे दिवे असावेत. सहा दिव्यांपैकी पाच दिवे हे मंदिरात प्रज्वलित करावेत. प्रार्थना करा जे काही सोबत गोड नेले असेल त्याचे तीन भाग करा. दोन भाग शंकराला अर्पण करा. आणि जो एक दिवा आहे. एक दिवा आणि मिठाईचा जो एक भाग आहे तो घरी घेऊन या.

घरी घेऊन आल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी चौकटीच्या म्हणजेच आपल्या मेन दाराच्या मुख्य द्वाराच्या बाहेर चौकटीच्या उजव्या हाताला उंबरठा जवळ तो दिवा प्रज्वलित करावेत आणि मिठाईचा जो घरी आणलेला भाग आहे तो कुटुंबासोबत प्रसाद म्हणून आपण खावा.

पाच सोमवार हे व्रत मनोभावाने भक्ती भावाने पूर्ण श्रद्धेने हे व्रत कोणीही करू शकतात. तुमच्या घरात दारिद्र्य गरीबी कोणताही दुर्गम आजार जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत नक्की करा. तुम्ही भोले बाबाचे भक्त नसाल पूजा करत नसाल तरीही व्रत तुम्ही करू शकता.

इष्ट दैवत ग्रामदैवत हे सुद्धा शिवशंकराला मानतात. सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान श्रीहरी विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री तिरुपती बालाजी,इत्यादी रूपात भोले बाबांची पूजा करताना दिसून येतात. मित्रांनो मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या इच्छापूर्तीसाठी सांगितल्याप्रमाणे हे सोमवारचे व्रत तुम्ही नक्की करावे. नक्की हा फरक जाणून घ्यावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *